उपक्रम

भव्य भोंडला
ब्राह्मण महासंघ डोंबिवली आयोजित भव्य भोंडला दिनांक १ ऑक्टोंबर २०२२ रोजी शुभम हॉल, डोंबिवली पूर्व इथे अतिशय उत्साहात पार पडला. प्रचंड गर्दी आणि उत्साही वातावरण अनुभवला मिळाले.सगळ्या वयाच्या महिला एकत्रित येवून एकच वेळी एखाच ठिकाणी फेर धरत होत्या.भारतीय संस्कृती, परंपरा कुठेतरी लोप पावत आहे आणि नवीन पिढीला हे भोंडला खेळ माहीत होणे अतिशय गरजेचे आहे हे दाखवण्याचा हा महासंघ चा प्रयत्न होता. कलर्स मराठी वहिनी वरील सूर नवा ध्यास नवा ची कलाकार सई जोशी हिची प्रमुख उपस्थिती होती. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे ह्यांनी भोंडला कार्यक्रमाचे उदघाटन केले आणि उपस्थित महिलांना भोंडला आणि हत्ती ह्याचे महत्व सांगितले. उत्कृष्ट सादरीकरण साठी घे भरारी ग्रुप ने बक्षीस पटकावले. उत्कृष्ट लक्षवेधी वेशभूषा साठी शु.य.मा.ब्राह्मण सभेचे मुक्ताई महिला मंडळाला बक्षिस मिळविले. उत्कृष्ट गीत जे स्वयं रचित आणि सामाजिक जाणीव करून देणारे होते या साठी जिजाऊ ग्रुप ने बक्षीस मिळवले. आपल्या गीतातून सादरीकरणातून नव्या जुन्याची सांगड घालत लक्षवेधी सादरीकरण यासाठी देवरूखे ब्राह्मण संघाने बक्षिसावर आपला हक्क मिळवला.कालच्या भोंडल्यात काही विशेष आणि लक्षवेधी क्षण अनुभवायला मिळाले. ९२ वर्षाच्या आजींनी इथे फेर धरला. तसेच ८२ वर्षाच्या आजी लहान मुलीच्या भूमिकेत परकल पोलके घालून दोन वेण्या घालून आल्या आणि त्यांनीही फेर धरला. संधीवातामुळे दोन्ही गुढगे वाकलेले असतानाही एका ८० वर्षांच्या महिलेने ग्रुप मध्ये फेर धरला आणि ग्रुपला बक्षीसही मिळवून दिले.लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. जवळ जवळ २७५ पेक्षा जास्ती महिलांनी सहभाग घेतला होता. महासंघाच्या कार्यकारणी च्या कार्यवाह अनघा बोन्द्रे, कोषाध्यक्ष जयंत कुलकर्णी,सह कोषाध्यक्ष उल्हास दाते, उपाध्यक्ष अनिकेत घमंडी आणि इतर सदस्य विनायक जांभेकर, शंतनू पुराणिक, विवेक वामोरकर, योगेश वीरकर, मृणाल सबनीस,अभिजित कानिटकर ह्यांनी भोंडला यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. महासंघाचे उपाध्यक्ष अनिकेत घमंडी ह्यांनी ह्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले. महिला समिती प्रमुख माधुरी जोशी ह्यांच्या नेतृत्वाखाली वैशाली कोरडे,क्षमा धामणकर आणि महिला समितीने अतिशय उत्तम प्रकारे कार्यक्रमाची जबाबदारी यशस्वी पणे पार पाडली. तसेच भोंडल्याची गायन टीम ज्यात सुरेखा जोशी,माधुरी एल्लाबादकर , दिवेकर काकु,जयश्री कुलकर्णी काकु,ताम्हणे काकु आणि अर्चना खेर ह्यांचा सहभाग ही अतिशय महत्वाचा होता आणि सगळ्यांनी आपली भूमिका चोख बजावली आणि कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. सगळ्यांचे मनापासुन अभिनंदन!!!

स्वरपंचमी
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे शुक्रवार,२ डिसेंबर २०२२ रोजी स्वरपंचमी ह्या सांगीतीक कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली इथे करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम आणि नागरी पुरवठा मंत्री माननीय नामदार श्री. रवींद्र चव्हाण साहेब ह्यांची उपस्थिती लाभली. श्री. रवींद्र चव्हाण साहेब ह्यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलाने करण्यात आली. ह्या प्रसंगी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे,कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे, डोंबिवलीकर मासिकाचे कार्यकारी संपादक श्री. प्रभू कापसे,संगीतकार कमलेश भडकमकर उपस्थित होते.तसेच ब्राह्मण महासंघाचे उपाध्यक्ष श्री. निलेश वीरकर, श्री. अनिकेत घमंडी, इतर सदस्य श्री. प्रज्ञेश प्रभुघाटे , श्री. संदीप पुराणिक श्री.योगेश वीरकर, श्री. विनायक जांभेकर, श्री. उल्हास दाते, श्री. अभिजित कानिटकर सौ. माधुरी जोशी, सौ. वैशाली कोरडे, सौ. मंजिरी देवधर हे उपस्थित होते. माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण साहेब ह्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि सर्व लिटिल चॅम्प गायकांना आशिर्वाद दिले. श्री. रवींद्र चव्हाण साहेब ह्यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणाऱ्या अनघा मोडक ह्यांना डोंबिवलीत कार्यक्रमाला परत डोंबिवलीकर परिवारातर्फे कार्यक्रमाला येण्यासाठी विनंती केली.अतिशय उत्तम आणि बहारदार असा कार्यक्रम झाला. सारेगमप लिटिल चॅम्प च्या ह्या सुमधुर मैफलीला डोंबिवलीकर ( एक सांस्कृतिक परिवार ) मुख्य प्रयोजक होते. तसेच पितांबरी प्रॉडक्ट्स, मेगा सर्व्हिसेस हे सह प्रयोजक होते. इतर प्रयोजकांमध्ये ग्लोब ग्रुप, गॅलप गिफ्ट, हेमंत सुगंधी भांडार, लोकमान्य मल्टी बँक आणि श्री स्वामी समर्थ के टरर्स होते. कार्यक्रमाला जवळ जवळ ५०० पेक्षा जास्त रसिक प्रेक्षक उपस्थित होते. ब्राह्मण महासंघ, डोंबिवली ह्या अग्रगण्य संस्थेने सांस्कृतिक परिवारात एक मानाचे स्थान मिळविले.

मोफत आधार कार्ड शिबीर आणि पोस्टाच्या विविध योजना
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि देवरुखे ब्राह्मण संघ डोंबिवली ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि टिळक नगर पोस्ट ऑफिस च्या सहकार्याने लहान मुलांसाठी मोफत आधार कार्ड शिबीर आणि पोस्टाच्या विविध योजना अश्या दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी घेतलेल्या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला. एकूण ७० लाभार्थिनी ह्यात भाग घेतला. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन हे देवरुखे ब्राह्मण संघातर्फे करण्यात आले होते. महासंघाचे सदस्य श्री. संदीप पुराणिक ह्यांनी कार्यक्रम ठरवून पुढे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महासंघाच्या इतर सदस्यांनी कार्यक्रमात मोलाचे योगदान दिले. महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे,उपाध्यक्ष श्री. अनिकेत घमंडी आणि श्री. निलेश वीरकर, कोषाध्यक्ष श्री. जयंत कुलकर्णी, सह कोषध्यक्ष श्री. उल्हास दाते, सह कार्यवाह सौ. मंजिरी देवधर, सल्लागार मंडळ सदस्य श्री. प्रशांत जोशी तसेच महासंघाचे इतर सदस्य सौ. उचिता निमकर, सौ. वैशाली कोरडे, सौ. माधुरी जोशी, आणि श्री. प्रज्ञेश प्रभुघाटे ह्यांनी सहभाग घेतला. सर्वांचे मनःपूर्वक आभार!!

सहकारी गृहनिर्माण संस्था – पुनर्विकास चर्चा
दिनांक ९ ऑक्टोबर २०२२ रोजी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित सहकारी गृहनिर्माण संस्था - पुनर्विकास चर्चा सत्राला उदंड प्रतिसाद लाभला. ३०० पेक्षा जास्त सोसायटी धारकांनी ह्या चर्चा सत्राला उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे उदघाटन हे महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे ह्यांनी केले. ३ तासापेक्षा जास्त वेळ चाललेल्या ह्या चर्चा सत्रात श्री. माधव चिकोडी, श्री. केशव चिकोडी तसेच वरिष्ठ वकील श्री. श्रीनिवास घैसास ह्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. सर्व नागरिकांनी परत असे चर्चा सत्र ब्राह्मण महासंघ, डोंबिवली ह्यांनी आयोजित करावे ह्या साठी आग्रह धरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महासंघाचे सदस्य श्री. शंतनू पुराणिक ह्यांनी एक हाती सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले. उपाध्यक्ष श्री. अनिकेत घमंडी ह्यांची प्रबळ साथ मिळाली. महासंघाच्या कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे ह्यांनी आभार प्रदर्शन केले. महासंघाचे सदस्य जयंत कुलकर्णी, विवेक वामोरकर, उल्हास दाते, अभिजीत कानिटकर, मंजिरी देवधर, वैशाली कोरडे, मृणाल सबनीस आणि योगेश वीरकर ह्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाची साथ दिली.
► https://youtube.com/playlist?list=PLHf6ggUmfCrBZhjkOJMkOaVFiKRMykaht

EXPO 2022
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित EXPO 2022 प्रदर्शनाचे उदघाटन आज १९ ऑगस्ट रोजी श्री. राजेंद्र हुंजे ह्यांच्या हस्ते झाले. सर्व प्रकारच्या ग्राहकोपयोगी वस्तूंचे हे प्रदर्शन १९ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट ह्या दरम्यान ब्राह्मण सभा डोंबिवली पूर्व इथे होत आहे. प्रदर्शनाच्या उदघाटनाला ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे ह्यांनी सर्व नागरिकांना प्रदर्शनास भेट देण्याचे तसेच वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहन केले. उदघाटन सोहळ्यास ब्राह्मण महासंघाचे कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे, उपाध्यक्ष श्री. निलेश वीरकर, कोषाध्यक्ष श्री जयंत कुलकर्णी, सह कोषाध्यक्ष श्री उल्हास दाते, प्रदर्शन प्रमुख श्री विवेक वामोरकर, सह कार्यवाह सौ मंजिरी देवधर, माजी अध्यक्ष श्री प्रज्ञेश प्रभुघाटे, देशस्थ ऋग्वेदी संघाचे अध्यक्ष श्री जे के जोशी, विश्वस्त अध्यक्ष श्री अविनाश कुलकर्णी, देवरुखे संघांचे अध्यक्ष श्री प्रशांत जोशी, BBNG चे श्री अरविंद कोऱ्हाळकर, तसेच महासंघाचे इतर सदस्य श्री अभिजित कानिटकर, श्री विनायक जांभेकर, श्री योगेश वीरकर, सौ उचिता निमकर, सौ क्षमा धामणकर, सौ मृणाल सबनीस, श्री शंतनू पुराणिक, सौ वैशाली कोरडे आणि सौ माधुरी जोशी आणि नागरिक बऱ्याच संख्येनी उपस्थित होते.

मोफत आयुर्वेदिक उपचार सल्ला तसेच रक्त्त तपासणी शिबिर
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित सिमसार आयुर्वेद रुग्णालय व चिकित्सालय तसेच श्री पॅथॉलॉजी लॅब यांच्या मार्फत आणि देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ संस्थेच्या सहकार्याने सर्व प्रकारच्या रोगांसाठी मोफत आयुर्वेदिक उपचार सल्ला तसेच रक्त्त तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक २६ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजे पर्यंत करण्यात आले होते. देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे अध्यक्ष श्री. जे के जोशी ह्याच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष श्री अविनाश कुलकर्णी, कार्यवाह श्री. नरेश कुलकर्णी उपस्थित होते. शुक्ल यजुर्वेदी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रदीप जोशी, श्री. सच्चीदानंद शेवडे, महासंघाचे माजी अध्यक्ष श्री. प्रज्ञेश प्रभुघाटे आदी मान्यवरांनी शिबिरास भेट दिली. एकूण ११० लोकांनी रक्त तपासणी करून घेतली तसेच जवळ जवळ ४५ नागरिकांनी मोफत आयुर्वेदिक उपचार सल्ला हा तज्ञ डॉक्टरांकडून घेतला. सामाजिक बांधिलकी वाढविण्यात ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चा नेहमीच अग्रक्रम राहिला आहे. महासंघातर्फे सर्व पदाधिकारी, सभासद, सिमसार चिकित्सलाय, श्री पॅथॉलॉजी लॅब आणि देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे हार्दिक अभिनंदन आणि आभार!!

भव्य रक्तदान शिबिर
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि रोटरी विश्वनाथ मेमोरियल हेल्थ फाउंडेशन या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आणि सायन हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती समर्पित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन २९ मे २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३वाजे पर्यंत श्री. गोविंदानंद श्रीराम मंदिर ट्रस्ट ( श्री. स्वामी समर्थ मठ ) रामनगर, डोंबिवली येथे आयोजित करण्यात करण्यात आले होते. ह्या रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला. एकूण ९४ बाटल्या रक्त जमा झाले. आणखी रक्तदाते हे रक्तदान करण्यासाठी उत्सुक होते. ब्राह्मण महासंघ, डोंबिवली च्या सर्व सदस्यांचे, रोटरी विश्वनाथ मेमोरियल ट्रस्ट च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार!!

समाज प्रबोधन कार्यक्रम पुष्प तिसरे - विषय : विवाह संस्कार
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण संघ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने समाज प्रबोधन कार्यक्रमाचे तिसरे पुष्प - विवाह संस्कार हे दिनांक २६ नोव्हेंबर रोजी ज्ञानेश्वर कार्यालय, डोंबिवली पश्चिम इथे झाले. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. प्रमुख वक्ते वेदमूर्ती श्री.विनायक भातखंडे गुरुजी ह्यांनी अतिशय सहज पद्धतीने विविध गोष्टींची सोप्प्या भाषेत माहिती दिली. कार्यक्रम सुनियोजित पणे पार पाडण्यासाठी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली कार्यकारणी सदस्य श्री. शंतनू पुराणिक, सौ. वैशाली कोरडे, श्री. अभिजित कानिटकर ह्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ब्राह्मण महासंघ, डोंबिवली च्या सर्व सदस्यांचे, उपस्थित डोंबिवलीकर तसेच शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार !




भव्य भोंडला 2023
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि सर्व संलग्न संस्था आयोजित भव्य भोंडला कार्यक्रमाचे आयोजन हे मंगळवार, दिनांक १७ ऑक्टोबर, २०२३ रोजी ब्राह्मण सभा, डोंबिवली इथे करण्यात आले होते. एकत्रित येऊन आपली परंपरा वाढविणे आणि संस्कृती जपण्याच्या दृष्टीने डोंबिवली मध्ये ब्राह्मण महासंघ आणि सर्व संलग्न संस्था ह्या एकत्र मिळून विविध कार्यक्रम करण्यात पुढाकार घेत आहेत.
प्रचंड मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देत महिला वर्ग भोंडला कार्यक्रमासाठी उपस्थित होता.
ब्राह्मण सभा कार्याध्यक्षा सौ.सुचेता ताई पिंगळे,ब्राह्मण महासंघ, डोंबिवली कार्यवाह सौ.अनघा बोंद्रे,ब्राह्मण सभा महिला समिती प्रमुख सौ.विद्या भिडे,ब्राह्मण महासंघ, डोंबिवली महिला समिती प्रमुख ॲड. सौ.माधुरी जोशी आणि सुरुची केटरर्स च्या सौ.भाग्यश्री प्रभुघाटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन भोंडला कार्यक्रमाची सुरुवात झाली. भोंडला कार्यक्रमा मध्ये एकूण ५ स्पर्धा ठेवल्या होत्या. १. उत्कृष्ट सादरीकरण, २. उत्कृष्ट गाणे, ३. उत्कृष्ट वेशभूषा,४. उत्कृष्ट हत्ती सजावट आणि ५. लक्षवेधी वेशभूषा. सर्व ज्ञाती संस्थेच्या संघाने दिलेल्या वेळेमध्ये उत्कृष्ट पणे भोंडला सादरीकरण केले. भोंडला कार्यक्रमाची बक्षिसे ही -
► उत्कृष्ट वेशभूषा कऱ्हाडे ब्राह्मण संघ
► उत्कृष्ट गाणी ब्राह्मण सभा
► उत्कृष्ट हत्ती सजावट चित्तपावन संघ
► उत्कृष्ट सादरीकरण देवरुखे संघ
► लक्षवेधी वेशभूषा बक्षीस -आरती म्युनिश्वर( अहिल्या च्या वेशभू्षेसाठी )
उपस्थित परीक्षकांनी उरलेल्या तीन संघांना सुद्धा भोंडला कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर केले.
भोंडला चा शेवट हा नेहमी खिरापत ओळखून होतो. तसाच एक खेळ कार्यक्रमात घेतला गेला.प्रत्येक संघाने आपली खिरापत आणली होती आणि तो संघ सोडून इतरांनी ती ओळखायची होती व त्यालाही बक्षीस होते.
भोंडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे महासंघाच्या कार्यकारिणी सदस्या आदिती जोशी यांनी केले.
परीक्षक म्हणून अनुराधा ताई मोहीदेकर,अनुराधा ताई फाटक आणि प्रतिभा ताई बिवलकर ह्या लाभल्या होत्या. तर वेळ नियंत्रक म्हणून शुभांगी ताई दूनाखे आणि पल्लवी आंबेकर यांनी उत्कृष्ट भूमिका निभावली. महिलांमधील सुप्त कला, गुणांना वाव हा हे भोंडला कार्यक्रमामुळे मिळाला. अतिशय सुंदर आणि हटके सादरीकरण तसेच वेग वेगळे विषय घेवून प्रत्येक संघाने भोंडल्याची गाणी ही खूपच छान पद्धतीने बसवली होती. आयोजक म्हणून ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे ॲड माधुरी जोशी आणि ब्राह्मण सभा, डोंबिवली तर्फे विद्या भिडे यांनी या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतली.
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, ब्राह्मण सभा, डोंबिवली चे संयुक्त कार्यवाह श्री. प्रदीप गोसावी, मृणाल सबनीस, श्रीपाद कुलकर्णी, देवरुखे संस्थेच्या अध्यक्षा मनीषा धोपटकर, तसेच सर्व संलग्न संस्थाचे पदाधिकारी हे कार्यक्रमाला उपस्थित होते.
भविष्यात वेग वेगळे कार्यक्रम हे आणखी मोठ्या प्रमाणात ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि सर्व संलग्न संस्था मिळून करणार असून त्यायोगे सर्व ज्ञाती समाज अधिक प्रमाणात एकत्रित होण्यास निश्चित मदत होणार आहे.

EXPO 2023 - भव्य ग्राहक पेठ (प्रदर्शन आणि विक्री )
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित EXPO- 2023 ( दिनांक ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर, सकाळी १० ते रात्री ९ वाजे पर्यंत ) ह्या भव्य ग्राहक पेठेच्या ( प्रदर्शन आणि विक्री ) उदघाटन समारंभाचा सोहळा हा दिनांक ८ सप्टेंबर रोजी ब्राह्मण सभा, तळ मजला हॉल, डोंबिवली पूर्व इथे मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुनील कुराडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त ( वाहतूक विभाग ) श्री. मंदार धर्माधिकारी हे होते. पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते हे विशेष आमंत्रित होते. दोन्ही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि फीत कापून प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. ह्या वेळी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे, सह कार्यवाह आणि प्रकल्प प्रमुख सौ. मंजिरी देवधर, उपाध्यक्ष श्री. अनिकेत घमंडी आणि श्री. निलेश वीरकर, कोषाध्यक्ष श्री. जयंत कुलकर्णी, सह कोषाध्यक्ष श्री. उल्हास दाते, कऱ्हाडे सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण नाटेकर, चित्तपावन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. माधव घुले, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष श्री. मधुकर कुलकर्णी, कार्यवाह श्री. सुधीर बर्डे, देवरुखे संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनीषा धोपटकर, काण्व परिषद संस्थेचे कार्यवाह श्री. मधुकर कुलकर्णी, कल्याण जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. सचिन आंबेकर तसेच ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे सर्व सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाला ABP माझा च्या ज्ञानदा कदम तसेच भारतीय डिजिटल पार्टी ( You tube channel ) चे श्री. अमेय कदम ह्यांनी भेट दिली. ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित EXPO - 2023 ( भव्य ग्राहक पेठ - प्रदर्शन आणि विक्री ) च्या आज दुसऱ्या दिवशी दिनांक ९ सप्टेंबर रोजी नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. सर्व स्टॉल वर प्रचंड गर्दी होती.
प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सौ. सायली मुतालिक ( Managing Director - ParaForce HR Services Pvt. Ltd, महिला उद्योजक आघाडी प्रमुख भारतीय जनता पार्टी- महाराष्ट्र राज्य ) ह्यांनी प्रदर्शनाला विशेष भेट दिली आणि सर्वांचे कौतुक केले. सौ. सायली मुतालिक ह्यांच्या हस्ते ह्या वेळी सर्व स्टॉल धारकांचा सन्मान करण्यात आला.
तसेच देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्थेचे अध्यक्ष श्री. जगन्नाथ जोशी, विश्वस्त अध्यक्ष श्री. अविनाश कुलकर्णी ह्यांच्या हस्ते प्रायोजकांचा सन्मान करण्यात आला.
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित EXPO - 2023 ( भव्य ग्राहक पेठ - प्रदर्शन आणि विक्री ) च्या तिसऱ्या दिवशी दिनांक १० सप्टेंबर रोजी पण नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. सर्व स्टॉल वर सतत गर्दी होती. प्रदर्शन हे अतिशय भव्य प्रमाणात आणि नियोजित पणे संपन्न झाले. अडीच दिवसांत ४५०० पेक्षा जास्ती नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली आणि खरेदी केली.
प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी ब्राह्मण सभा, डोंबिवली चे अध्यक्ष डॉ. विनय भोळे, Gallop गिफ्ट चे श्री. प्रदीप जोशी, IAS श्री. विजय जोशी, मान्यवर श्री विश्वजित देशपांडे, श्री. सच्चीदानंद शेवडे अश्या अनेक नावाजलेल्या लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली.
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे आयोजित करण्यात आलेले प्रदर्शन EXPO - 2023 म्हणजे एक शानदार सोहळा होता.

गर्भाधान संस्कार ते उपनयन संस्कार
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा, डोंबिवली ह्यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित केलेल्या समाज जागृती आणि समाज प्रबोधनपर गर्भाधान संस्कार ते उपनयन संस्कार या व्याख्यानामध्ये गर्भाधान, पुसंवन सीमांतोन्नयन, जातकर्म,नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, कर्णभेद, विद्यारंभ, उपनयन, वेदारंभ समावर्तन, विवाह, अंत्येष्टी अश्या विविध मुद्दयांवर प्रमुख वक्ते श्री. मुकुंद जोशी गुरुजी ह्यांनी उपस्थित श्रोत्यांना सखोल माहिती दिली. मुकुंद जोशी गुरुजी ह्यांनी व्याख्यानाची सुरवात ही संस्कार म्हणजे काय ह्या मुद्द्यावर भर देऊन केली
संस्कार म्हणजे चांगलं निर्माण करणे.. संस्कारांमुळे व्यक्तीचं मन आणि मस्तिष्क पवित्र होते . सुशिक्षित व्यक्ती ही स्वतः ची व स्वतःच्या कुटुंबाची प्रगती करू शकतो, पण सुसंस्कारित व्यक्ती ही स्वतः सोबत समाजाची प्रगती करू शकतो. आपल्या पूर्वजांनी समाज सुसंस्कारित व्हावा म्हणून काही मार्गदर्शन केले आहे, ते म्हणजे सोळा संस्कार...
१) गर्भाधान संस्कार - अनेक ठिकाणी ऋतुशांती किंवा रजोदर्शन शांती असे म्हणतात. ज्या वेळी कुमरिकेला स्रित्व प्राप्त होतं त्या वेळेस काही दोष असतील तर ते निवारणासाठी हा संस्कार केला जातो
२) पुसंवन - गर्भधारणा झाल्यावर गर्भ व मातेची पकृत्ती स्थिर राहण्यासाठी हा संस्कार करतात.
३) सिमंतोनयन - गर्भवती स्त्री व गर्भ प्रसन्न राहण्यासाठी , स्रीचे डोहाळे पुरवण्यासाठी तसेच गर्भाच्या सर्वांगी विकासासाठी हा म्हणजेच डोहाळे जेवण संस्कार करतात.
४) जातकर्म - ह्या संस्कारात बाळ जन्माला आल्यावर नाळ छेदनापूर्वी बाळाला वडिलांनी सोन्याच्या तारेने मध चाटवले जाते.
५) नामकरण - ह्या जीवर्म्याने मागील जन्माची ओळख पुसली असते, ह्या जन्मात त्याला त्याची नवीन ओळख मिळवून देण्यासाठी हा संस्कार आहे.
६) निष्क्रमण - बाळाच्या बल, बुद्धी, आयुष्याच्या विकासासाठी सूर्य देवाचे दर्शन व्हावे म्हणून मंदिरात नेतात.
७) अन्नप्रशान - बाळाच्या शारीरिक, मानसिक, व भावनिक विकासासाठी षडरस अन्नाची चव दिली जाते.
८) कर्णभेद - जीवनात स्थिरता प्राप्त होण्यासाठी व राहू ग्रह शांत राहण्या साठी मुलगा असो वा मुलगी कान टोचतात.
९) चौल/ चुडा कर्म - पूर्व जन्माचे पातक नाश होण्यासाठी हा संस्कार म्हणजे जाऊळ हा संस्कार करतात.
१०) विद्यारंभ - बालकाला अक्षर ओळख होण्यासठी हा संस्कार सांगितलं आहे.
११) उपनयन संस्कार - हा कुमारांसाठीचा मुख्य संस्कार आहे. ब्रम्हचर्य व्रताचे पालन करून उत्तम ज्ञानार्जन करण्यासाठी हा संस्कार आहे. गायत्री मंत्राचा उपदेश घेऊन यज्ञपवित ( जानवे ) घालतात. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो तसेच वैदिक धर्मात सांगितलेली कर्मे करण्याचा अधिकार प्राप्त होतो.
व्याख्यानाला ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा अध्यक्ष श्री. प्रदीप जोशी गुरुजी, विश्वस्त अध्यक्ष श्री. मधुकर कुलकर्णी, कार्यवाह श्री. सुधीर बर्डे, कऱ्हाडे सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण नाटेकर तसेच डोंबिवली मधील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन हे श्री. शंतनू पुराणिक ह्यांनी केले. आभार प्रदर्शन हे सौ. माधुरी जोशी ह्यांनी केले.

सामुहिक श्रावणी
दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि सर्व संलग्न ब्राह्मण संस्था ( देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ, चित्तपावन ब्राह्मण संघ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभा, देवरुखे ब्राह्मण संघ, काण्व परिषद आणि ब्राह्मण सभा, डोंबिवली ) तसेच पुरोहित मंडळ ( डोंबिवली पूर्व ) आणि देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळ, डोंबिवली ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण समाज एकत्रिकरण या दृष्टीने डोंबिवली मध्ये पहिले पाऊल म्हणून प्रथमच सामुहिक श्रावणी कार्यक्रमाचे भव्य आयोजन हे कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळाचे समाज मंदिर हॉल, टिळकनगर, डोंबिवली पूर्व इथे सकाळी ७ वाजल्या पासून करण्यात आले होते. एकूण २२५ पेक्षा जास्ती सदस्यांनी श्रावणी कार्यक्रमात भाग घेतला आहे. ऋग्वेदी, कृष्ण यजुर्वेदी आणि शुक्ल यजुर्वेदी पद्धतीने श्रावणी अत्यंत विधिवत प्रकारे करण्यात आली. ब्राह्मण समाज एकत्रिकरण दृष्टीने महत्वाचे पाऊल हे ब्राह्मण महासंघा तर्फे डोंबिवली मध्ये रोवण्यात आले.
► https://youtu.be/7eIMg-PF-O0?si=JP89aUekVwp9mxQb



नित्य नैमित्तीक धार्मिक कार्य आणि आपण
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ जून २०२३ रोजी" नित्य नैमित्तीक धार्मिक कार्य आणि आपण " ह्या विषयावर पहिल्या चरणाच्या समाज प्रबोधन कार्यक्रमाची यशस्वी पणे सांगता ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, डोंबिवली पश्चिम इथे झाली. प्रमुख वक्ते श्री. सचिन ठाकुरदेसाई ( अध्यक्ष - पुरोहित मंडळ, डोंबिवली पूर्व ) ह्यांनी अतिशय सहज सुंदर भाषेत विविध नित्य धार्मिक कार्याची माहिती आणि आवश्यकता सर्व श्रोत्यांना समजावून सांगितली. डोंबिवली मधील बऱ्याच जेष्ठ आणि मान्यवर नागरिक ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. विविध प्रकारचे समाज प्रबोधन आणि जागृती कार्यक्रम दर दोन महिन्यांनी दोन्हीही संस्था संयुक्त विद्यमाने करणार आहेत. कार्यक्रमाला ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, शुक्ल यजुर्वेदी संस्थेचे विश्वस्त अध्यक


विविध उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चा एक शैक्षणिक उपक्रम
दिनांक ६ मे २०२३ रोजी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे ज्ञानमंदिर विद्यासंकुलाच्या कोतकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवली इथे विद्यार्थ्यांना टेबल टेनिस टेबल आणि इतर साहित्य भेट देण्यात आले. सदर भेट ही महासंघाचे हितचिंतक श्री. अभिजित वैद्य ह्यांच्या माध्यमातून वैद्य कुटुंबीय ह्यांच्या तर्फे भालचंद्र वैद्य ह्यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात आली. ह्या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता पाखले, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे, सह कोषाध्यक्ष श्री. उल्हास दाते, कार्यकारिणी सदस्य सौ. माधुरी जोशी तसेच विद्यालयाचे शिक्षक आणि इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. शाळेतर्फे ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे आभार मानले.
► http://www.nyayranbhumi.com/2023/05/blog-post_71.html
► https://marathi.mumbaiaaspaas.com/table-tennis-table-other-materials-provided-to-kotkar-school-by-brahmin-federation/




मानसिक आरोग्य आणि समस्या माहिती सत्र
दिनांक १५ एप्रिल २०२३ रोजी, ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित मानसिक आरोग्य आणि समस्या ह्या माहिती सत्र कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. प्रमुख वक्त्या सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ व समुपदेशक सौ. वृषाली आठल्ये ह्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थित नागरिक बंधू भगिनी ह्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले तसेच विचारलेल्या सर्व प्रश्नांना / समस्यांना सविस्तर उत्तरे दिली. कार्यक्रम प्रमुख म्हणून ब्राह्मण महासंघ, डोंबिवली कार्यकारणी सदस्य सौ. माधुरी जोशी ह्यांनी उत्तम प्रकारे नियोजन केले. महासंघाचे कार्यकारिणी सदस्य श्री. योगेश वीरकर, श्री. अभिजित कानिटकर, सौ. उचिता निमकर, सौ.आदिती जोशी, इतर सदस्य सौ. विदुला वामोरकर, सौ.रुपाली उपाध्ये , सौ. अश्विनी मुजुमदार ह्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाची साथ दिली. ह्यावेळी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे, उपाध्यक्ष श्री. अनिकेत घमंडी, महासंघाचे माजी अध्यक्ष श्री. प्रज्ञेश प्रभुघाटे तसेच चित्तपावन संस्थेचे कार्याध्यक्ष आणि महासंघाचे सल्लागार सदस्य श्री. माधव घुले, देवरुखे संस्थेच्या अध्यक्षा आणि महासंघाच्या सल्लागार सदस्य सौ. मनीषा धोपटकर तसेच महासंघाच्या इतर संलग्न संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ह्या कार्यक्रमासाठी श्री. माधव घुले ह्यांनी सर्व बहुमोल्य मदत केली ह्या बद्दल त्यांचे मनापासून आभार ! कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माधुरी जोशी ह्यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. वैशाली कोरडे ह्यांनी दिला. आभार प्रदर्शन हे कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे ह्यांनी केले.

विविध व्यवसाय संधी आणि सरकारी योजना
दिनांक १९ मार्च २०२३ रोजी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि ब्राह्मण सभा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत विविध व्यवसाय संधी आणि सरकारी योजना ह्या विषयाबाबत माहिती सत्राचे आयोजन हे ब्राह्मण सभा, पहिला मजला इथे करण्यात आले होते. प्रमुख वक्ते म्हणून श्री. प्रदीप पेशकार ह्यांनी उपस्थितांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले तसेच विविध सरकारी योजना आणि व्यवसाय संधी या बाबत सविस्तर माहिती दिली. ह्यावेळी जवळ जवळ २०० पेक्षा अधिक सर्व श्रेणी व्यावसायिक / उद्योजक / नागरिक ह्यांनी माहिती सत्राचा लाभ घेतला. ह्यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. विनय भोळे, ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, ब्राह्मण महासंघ कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे तसेच ब्राह्मण सभा आणि ब्राह्मण महासंघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. महासंघाचे सदस्य श्री. योगेश वीरकर ह्यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण महासंघाचे कोषाध्यक्ष श्री. जयंत कुलकर्णी आणि कार्यकारिणी सदस्य श्री. विवेक वामोरकर ह्यांनी उत्तम प्रकारे आयोजन आणि नियोजन केले.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
सामुहिक श्रावणी : २०२४
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि सर्व संलग्न ब्राह्मण संस्था ( देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ, चित्तपावन ब्राह्मण संघ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभा, देवरुखे ब्राह्मण संघ, काण्व परिषद आणि ब्राह्मण सभा, डोंबिवली ) तसेच पुरोहित मंडळ डोंबिवली ( पूर्व ) सदस्य आणि देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळ, डोंबिवली पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण समाज एकत्रिकरण या दृष्टीने डोंबिवली सुरु केलेल्या सामुहिक श्रावणी कार्यक्रमाच्या भव्य आयोजन हे कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळाचे समाज मंदिर हॉल, टिळकनगर, डोंबिवली पूर्व इथे दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६.३० वाजल्या पासून करण्यात आले होते. एकूण १५५ पेक्षा जास्त सदस्यांनी श्रावणी कार्यक्रमात भाग घेतला आहे. ऋग्वेदी, कृष्ण यजुर्वेदी आणि शुक्ल यजुर्वेदी पद्धतीने श्रावणी अत्यंत विधिवत प्रकारे करण्यात आली.
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे दरवर्षी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन हे भव्य प्रमाणात करण्यात येते त्यामुळे ब्राह्मण समाजाची ताकद ही अधिक प्रमाणावर वाढण्यास मदत होत आहे.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
समाज प्रबोधन कार्यक्रम - पुष्प ५ - " आचार, विचार आणि संस्कार "
" आचार, विचार आणि संस्कार " हा विषय असलेल्या समाज प्रबोधन कार्यक्रमाचे पाचवे पुष्प आज दिनांक ३० जून, २०२४ रोजी श्रोत्यांच्या उत्स्फूर्त सहभागानी पार पडले. कार्यक्रमाला ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, कोषाध्यक्ष श्री. जयंत कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य श्री. शंतनू पुराणिक, सौ. वैशाली कोरडे, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रदीप जोशी गुरुजी, कार्याध्यक्ष श्री. सुधीर बर्डे, विश्वस्त अध्यक्ष श्री. मधुकर कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री. किशोर राव तसेच यतीन पाठक इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शंतनू पुराणिक ह्यांनी आणि आभार प्रदर्शन श्री. किशोर राव ह्यांनी केले.
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने सादर होणाऱ्या समाज प्रबोधन व्याख्यान शृंखलेला नेहमीच भरघोस प्रतिसाद लाभतो.
सदर पाचवे पुष्प कार्यक्रमानिमित्ताने आचार्य 90 FM ह्या रेडिओ चॅनेल नी घेतलेली मुलाखत जरूर बघा. प्रमुख वक्ते श्री. दिलीप गोडसे गुरुजी आणि सोबत ब्राह्मण महासंघ, डोंबिवली संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री. शंतनू पुराणिक.






व्याख्यानमाला : " संभवामि युगे युगे"
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिदिवसीय अध्यात्मिक व्याख्यानमाला ७ जुन ते ९ जुन अशी आयोजित केली होती. या तिन्ही दिवसासाठी सुप्रसिद्ध अर्थतज्ञ, लेखक व व्याख्याते श्री. चंन्द्रशेखर टिळक लाभले होते.
पहिल्या दिवशी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कल्याणच्या जेष्ठ व श्रेष्ठ सदस्य श्रीमान वसंतराव पुरोहित, यांना शिक्षणमहर्षी, राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार, तसेच त्यांच्या सौभाग्यवती वृंदाताई पुरोहित, यांना वेद उपासक, तसेच वेद अभ्यासासाठी डाॅक्टरेट तसेच महाराष्ट्र राज्य वैदिक परिषदेवर अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल या उभयतांचा शाल, श्रीफळ, पुष्प गुच्छ मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
प्रमुख वक्ते श्री. चन्द्रशेखर टिळक यांनी पहिल्यांदा सांगितलं की निरूपण करणे इतका मी मोठा नाही त्यामुळे हे व्याख्यान म्हणूनच आपण सर्वांनी लक्षात घ्यावे. त्यांनी पहिल्या दिवशी रामदास स्वामी ह्यांच्या विषयी विवेचन करतांना रामदास हे कसे समर्थ आहेत हे त्यांच्या ओघवत्या वाणी/शैलीत प्रेक्षकांपुढे सादर केले.
दुसऱ्या दिवशी भगवान परशुराम हा विषय होता. सप्त चिरंजीवांमध्ये परशुरामांनाच भगवान का म्हटलं जातं, हे त्यांनी सर्वांना चांगल्या पद्धतीने सांगितले, नवीन भूमी निर्माण का केली, तसंच की श्रावण बाळाची कावड आहे. त्याला परशुरामासन का म्हणतात हे टिळकांनी त्यांच्या अमोघ शैलीत सुरेख विवेचन केले.
तिसऱ्या व शेवटच्या दिवशी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कल्याण शाखेच्या दोन मान्यवर सदस्य श्रीमान मनोज पळसोदकर यांना रसायन शास्त्र विषयातील प्रबंधाबद्दल डाॅक्टरेट तसेच तरुण सदस्य श्रीमान अमित देशमुख यांना, आध्यात्मिक, ज्योतिष विषयक, तसेच कृष्ण विषयावरील प्रबंधास डाॅक्टरेट मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे श्री. अथर्व जोशी यांनी श्री. चन्द्रशेखर टिळक यांचा शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सन्मान केला.
त्यांनतर श्री. चंद्रशेखर टिळक आद्य शंकराचार्य याविषयी विवेचन करताना , अद्वैत् वाद, युद्धात राजा जिंकण्यापेक्षा प्रजा जिंकणे आवश्यक आहे व तीन दिवसांच्या व्याख्यानामध्ये तिघांची तुलना करुन या कार्यक्रमाचा समारोप केला.
ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष मानस पिंगळे, देशस्थ ऋग्वेदी संघ, कल्याण अध्यक्ष सुरेशराव कुळकर्णी, कोषाध्यक्ष दिपक देशपांडे, अथर्व जोशी मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्राजक्ता आपटे, मुग्धा घाटे, शंतनु पुराणिक यांनी केले.
तीनही दिवसाला पसायदान तसंच शेवटच्या दिवशी आभार प्रदर्शन अधिवक्ता मंदार कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास विजय चाव्हरे, शंतनु पुराणिक, शुभांगी कुलकर्णी, मुग्धा घाटे, प्रमोद सांगली, जितेंद्र कांबळे तसेच दोन्ही संस्थांच्या कार्यकारणी यांनी मेहनत घेतली तसेच तिन्ही दिवस कल्याण/डोंबिवलीकर दर्दी रसिकांनी या व्याख्यानमालिकेत सहभाग नोंदविला..






व्याख्यानमाला : " संभवामि युगे युगे"
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिदिवसीय अध्यात्मिक व्याख्यानमाला ७ जुन ते ९ जुन अशी आयोजित केली होती. या तिन्ही दिवसासाठी सुप्रसिद्ध अर्थतज्ञ, लेखक व व्याख्याते श्री. चंन्द्रशेखर टिळक लाभले होते.
पहिल्या दिवशी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कल्याणच्या जेष्ठ व श्रेष्ठ सदस्य श्रीमान वसंतराव पुरोहित, यांना शिक्षणमहर्षी, राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार, तसेच त्यांच्या सौभाग्यवती वृंदाताई पुरोहित, यांना वेद उपासक, तसेच वेद अभ्यासासाठी डाॅक्टरेट तसेच महाराष्ट्र राज्य वैदिक परिषदेवर अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल या उभयतांचा शाल, श्रीफळ, पुष्प गुच्छ मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
प्रमुख वक्ते श्री. चन्द्रशेखर टिळक यांनी पहिल्यांदा सांगितलं की निरूपण करणे इतका मी मोठा नाही त्यामुळे हे व्याख्यान म्हणूनच आपण सर्वांनी लक्षात घ्यावे. त्यांनी पहिल्या दिवशी रामदास स्वामी ह्यांच्या विषयी विवेचन करतांना रामदास हे कसे समर्थ आहेत हे त्यांच्या ओघवत्या वाणी/शैलीत प्रेक्षकांपुढे सादर केले.
दुसऱ्या दिवशी भगवान परशुराम हा विषय होता. सप्त चिरंजीवांमध्ये परशुरामांनाच भगवान का म्हटलं जातं, हे त्यांनी सर्वांना चांगल्या पद्धतीने सांगितले, नवीन भूमी निर्माण का केली, तसंच की श्रावण बाळाची कावड आहे. त्याला परशुरामासन का म्हणतात हे टिळकांनी त्यांच्या अमोघ शैलीत सुरेख विवेचन केले.
तिसऱ्या व शेवटच्या दिवशी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कल्याण शाखेच्या दोन मान्यवर सदस्य श्रीमान मनोज पळसोदकर यांना रसायन शास्त्र विषयातील प्रबंधाबद्दल डाॅक्टरेट तसेच तरुण सदस्य श्रीमान अमित देशमुख यांना, आध्यात्मिक, ज्योतिष विषयक, तसेच कृष्ण विषयावरील प्रबंधास डाॅक्टरेट मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे श्री. अथर्व जोशी यांनी श्री. चन्द्रशेखर टिळक यांचा शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सन्मान केला.
त्यांनतर श्री. चंद्रशेखर टिळक आद्य शंकराचार्य याविषयी विवेचन करताना , अद्वैत् वाद, युद्धात राजा जिंकण्यापेक्षा प्रजा जिंकणे आवश्यक आहे व तीन दिवसांच्या व्याख्यानामध्ये तिघांची तुलना करुन या कार्यक्रमाचा समारोप केला.
ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष मानस पिंगळे, देशस्थ ऋग्वेदी संघ, कल्याण अध्यक्ष सुरेशराव कुळकर्णी, कोषाध्यक्ष दिपक देशपांडे, अथर्व जोशी मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्राजक्ता आपटे, मुग्धा घाटे, शंतनु पुराणिक यांनी केले.
तीनही दिवसाला पसायदान तसंच शेवटच्या दिवशी आभार प्रदर्शन अधिवक्ता मंदार कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास विजय चाव्हरे, शंतनु पुराणिक, शुभांगी कुलकर्णी, मुग्धा घाटे, प्रमोद सांगली, जितेंद्र कांबळे तसेच दोन्ही संस्थांच्या कार्यकारणी यांनी मेहनत घेतली तसेच तिन्ही दिवस कल्याण/डोंबिवलीकर दर्दी रसिकांनी या व्याख्यानमालिकेत सहभाग नोंदविला..






जागतिक महिला दिन कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि संलग्न संस्था आयोजित जागतिक महिला दिन समारंभ रविवार दि.१० मार्च २०२४ रोजी सायं ५ ते ७ ह्या वेळेत ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, डोंबिवली पश्चिम इथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ह्या सुप्रसिद्ध निवेदिका आणि व्याख्यात्या मा.दीपाली केळकर ह्या होत्या. कार्यक्रमाला २५० पेक्षा अधिक उपस्थिती होती. ह्या कार्यक्रमाला पु. ना. गाडगीळ आणि सन्स ज्वेलर्स ह्यांचे पण सहकार्य लाभले होते.जागतिक महिला दिनाचे महत्व जाणून ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि सर्व संलग्न संस्था ह्यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रातील ६ कर्तृत्ववान महिलांचा शाल,पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यात रजनी वीरकर,रेखा नातू, वर्षा काळे, हेमांगी बोडस, अस्मिता देशपांडे,अनिता भुजबळ ह्यांचा समावेश आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यात ॲड.माधुरी बळवंत जोशी, वैशाली कोरडे, सारंगी जोगळेकर,विद्या भिडे, मनीषा धोपटकर, निलिमा चिंचणकर,अनुराधा कुलकर्णी आणि सर्व संलग्न संस्थांच्या महिला प्रतिनिधी ह्यांनी प्रचंड मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे माधुरी येल्लापूरकर ह्यांनी अतिशय सुंदर रीतीने केले. कार्यक्रमाची प्रस्तावना ही सौ. माधुरी जोशी ह्यांनी केली. सौ. अनुराधा कुलकर्णी ह्यांनी आभार प्रदर्शन केले. प्रमुख पाहुण्या सौ.दीपाली केळकर ह्यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. मा.दीपाली केळकर ह्यांनी आपल्या संवादात महिला शक्ती, स्त्री धन आणि विविध उखाणे अश्या २-३ विषयांवर जवळ जवळ दीड तासापेक्षा जास्त वेळ उत्तम निवेदन केले. ह्या कार्यक्रमाला पु. ना. गाडगीळ आणि सन्स चे उमेश स्थूळ, सुप्रिया बेहरे, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन संस्थेचे प्रदीप जोशी गुरुजी, सुधीर बर्डे, मधुकर कुलकर्णी , गौरी कुंटे,यतीन पाठक, ब्राह्मण सभेच्या कार्याध्यक्षा सुचेता पिंगळे, ब्राह्मण महासंघाच्या कार्यवाह अनघा बोन्द्रे, सदस्य शंतनू पुराणिक, देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे कार्यवाह नरेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष महाशबदे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.






समाज प्रबोधन कार्यक्रम ( पुष्प ४ ) -विषय : व्रतवैकल्ये, कुल धर्म - कुळाचार, धार्मिक शंका समाधान.
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने समाज प्रबोधन कार्यक्रम ( पुष्प ४) हा दिनांक ३ मार्च २०२४ रोजी ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, डोंबिवली पश्चिम इथे श्रोत्यांच्या गर्दीत पार पडला. वेदमूर्ती श्री. प्रदीप जोशी गुरुजी ह्यांनी सहज भाषेत व्रतवैकल्ये, कुलधर्म - कुळाचार, धार्मिक शंका समाधान ह्या विषयावर अनेक दैनंदिन गोष्टींचे सोप्प्या भाषेत विश्लेषण केले आणि उपस्थित श्रोत्यांना मुद्देसूर माहिती सांगितली आणि लोकांमधून आलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. २ तासा पेक्षा जास्ती चाललेल्या ह्या कार्यक्रमाला जवळ जवळ १५० पेक्षा अधिक लोकं उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे कार्यकारिणी सदस्य श्री. शंतनू पुराणिक ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन हे ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे कोषाध्यक्ष श्री. उल्हास दाते ह्यांनी केले. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभेचे विश्वस्त अध्यक्ष श्री. मधुकर कुलकर्णी, कार्यवाह श्री. सुधीर बर्डे, ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे आणि प्रमुख वक्ते वेदमूर्ती श्री. प्रदीप जोशी गुरुजी ह्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.
ह्याला कार्यक्रमात ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे जेष्ठ , गतिमंद, अपंग, दिव्यांग अश्या निराधार व्यक्तींसाठी सुरु करण्यात आलेल्या दत्तक योजनेअंतर्गत दोन लाभार्थिंना प्रमुख वक्ते वेदमूर्ती श्री. प्रदीप जोशी गुरुजी ह्यांच्या हस्ते मदतीची अधिकृत पत्रे देण्यात आली. त्याआधी ब्राह्मण महासंघ. डोंबिवली च्या सदस्या सौ. माधुरी जोशी ह्यांनी उपस्थित सर्वांना दत्तक योजनेची माहिती दिली.
कार्यक्रमाला ब्राह्मण महासंघ, डोंबिवली च्या कार्यवाह सौ.अनघा बोन्द्रे, कोषाध्यक्ष श्री. जयंत कुलकर्णी, सदस्य श्री. विवेक वामोरकर, सौ. वैशाली कोरडे, सौ. सारंगी जोगळेकर, BBNG चे मान्यवर श्री. अरविंद कोऱ्हाळकर आणि इतर सदस्य आणि डोंबिवलीकर उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रभात फेरी
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था डोंबिवली शाखा या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावारकर यांच्या ५८ व्या आत्मार्पण दिनानिमित्त अनोखी मानवंदना देण्यासाठी दिनांक २५ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रभात फेरी डोंबिवली इथे काढण्यात आली. बाजीप्रभू चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, सावरकर रस्ता डोंबिवली पूर्व अशा मार्गाने ही फेरी काढण्यात आली . प्रभात फेरी नंतर पाच मिनिटे आपल्या मनातील सावरकर अंतर्गत त्यांच्या व्यक्तीमत्वावर बोलण्याची अनेकांना संधी देण्यात आली. ह्या प्रभात फेरीला ३०० पेक्षा जास्ती उपस्थिती होती.१०० ते १२५ शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षक डोंबिवलीकर नागरिक आणि इतर मान्यवर ह्यांचा सहभाग होता. प्रभात फेरी मध्ये - शिवाई बालक मंदिर, विद्यानिकेतन, ओंकार इंटरनॅशनल स्कूल, किड्स कट्टा, लोकमान्य गुरुकुल ह्या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रभात फेरीत राष्ट्रीय स्वयंसेवक महिलांनी सुद्धा हिरीरीने भाग घेतला होता.एकूण ७ संस्थांचे सभासद उत्स्पूर्तपणे सहभागी झाले होते.
आपल्या मनातील सावरकर ह्या अंतर्गत माधुरी याडकीकर,बिनेश नायर,अंजली बापट, नीलिमा कोडोलिकर तसेच शाळांमधून -
किड्स कट्टा शाळेतून अथर्व पाटील,
शिवाई बालक शाळेतून हर्षदा मते, दिव्या काळे, आर्या सामंत
ओंकार इंटरनॅशनल शाळेतून दिशांत अधिकारी ह्यांनी सुरेख पणे सादरीकरण केले.
स्वांतत्र्यवीर सावरकर ह्यांच्या प्रतिमेचे पूजन आणि सावरकर उद्यान स्थित अखंड सावरकर ज्योतीचे पूजन हे ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे अध्यक्ष श्री मानस पिंगळे आणि स्वातंत्र्यवीरसावरकर सामाजिक संस्था डोंबिवली शाखे चे अध्यक्ष श्री. मंगेश राजवाडे ह्यांच्या हस्ते झाले.
छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या प्रतिमेचे पूजन हे जेष्ठ नागरिक श्री.सुरेश पुराणिक ह्यांच्या हस्ते झाले.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ अनघा बोंद्रे, कार्यवाह - ब्राह्मण महासंघ, डोंबिवली ह्यांनी केले. ह्या प्रभात फेरीला ब्राह्मण महासंघ, डोंबिवली अध्यक्ष चे श्री. मानस पिंगळे, कार्यवाह सौ अनघा बोन्द्रे, उपाध्यक्ष श्री. अनिकेत घमंडी आणि निलेश वीरकर, कोषाध्यक्ष श्री. जयंत कुलकर्णी, सह कोषाध्यक्ष श्री. उल्हास दाते, महासंघाचे सदस्य श्री. प्रज्ञेश प्रभुघाटे, श्री. संदीप पुराणिक, श्री. विवेक वामोरकर, श्री. शंतनू पुराणिक, सौ. माधुरी जोशी, सौ. माधुरी येल्लापूरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. मंगेश राजवाडे तसेच दोन्हीही संस्थाचे अनेक सदस्य उपस्थित होते.
Lokmat ePaper - राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर










ब्राह्मण संमेलन - २०२५
भव्य दिव्य कार्यक्रम. समस्त ब्राह्मण ज्ञातीची ताकद डोंबिवली मध्ये एकत्रित झाली.
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित ब्राह्मण संमेलन हे रविवार, दिनांक २ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २ ह्या वेळेत टिळकनगर, डोंबिवली (पूर्व) परिसरातील टिळकनगर शाळेच्या पटांगणावर मोठ्या प्रमाणावर संपन्न झाले.सन्माननीय ह. भ. प. चारुदत्त आफळे बुवां हे प्रमुख पाहूणे आणि प्रमुख वक्ते होते . ८०० पेक्षा जास्ती ब्राह्मण व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित होते.
न भुतो न भविष्यती असा कार्यक्रम हा बऱ्याच वर्षांनी झाला. ब्राह्मण महासंघ, डोंबिवली संस्थेच्या कार्यात एक मैलाचा टप्पा ह्या कार्यक्रमामुळे ओलांडला गेला.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
समाज प्रबोधन कार्यक्रम - ( पुष्प ६ )- धर्मशास्त्र एक वास्तव
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार,दिनांक १ डिसेंबर रोजी समाज प्रबोधन कार्यक्रमाचे अखेरचे पुष्प हे मोठ्या उपस्थितीत पार पडले.प्रमुख वक्ते वेदमूर्ती पुरुषोत्तम सुगावकर गुरुजी ह्यांनी अतिशय सूचक आणि समर्पक अश्या रीतीने धर्मशास्त्र एक वास्तव ह्या विषयाची मुद्दसूर मांडणी केली आणि उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच संपूर्ण आयोजन हे ब्राह्मण महासंघ, डोंबिवली संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री. शंतनू पुराणिक ह्यांनी समर्थ पणे सांभाळले.
कार्यक्रमाला ब्राह्मण महासंघ, डोंबिवली संस्थेचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रदीप जोशी, विश्वस्त अध्यक्ष श्री. मधुकर कुलकर्णी, कार्यवाह श्री.सुधीर बर्डे, ब्राह्मण महासंघ, डोंबिवली संस्था कार्यकारिणी सदस्य सौ. वैशाली कोरडे, सौ.उचिता निमकर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
महिला कर्करोग आरोग्य चिकित्सा शिबीर
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि देवरुखे ब्राह्मण संघ, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक, २४ नोव्हेंबर रोजी " महिला कर्करोग आरोग्य चिकित्सा शिबीर " देवरुखे ब्राह्मण संस्थेच्या सभागृहात मोठ्या प्रतिसादात पार पडले. डॉ. अमित घाणेकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळ जवळ ४० महिलांनी ( मर्यादित प्रवेश फक्त २५ असून सुद्धा ) शिबिरात झालेल्या माहिती विषयक कार्यक्रमाचा तसेच चिकित्सा प्रक्रियेचा लाभ घेतला. सामाजिक कार्य,शैक्षणिक, सामाजिक प्रबोधन, समाज जागृती, धार्मिक,सांस्कृतिक, व्यवसाय मार्गदर्शन , नोकरी सहाय्य,महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि इतर अनेक उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या ब्राह्मण महासंघ, डोंबिवली ह्या संस्थेच्या विशेष अश्या ह्या आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन आणि नियोजन यशस्वी पणे करण्यात महासंघाच्या सह कार्यवाह सौ.मंजिरी देवधर आणि देवरुखे संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनीषा धोपटकर ह्यांनी महत्वाची भूमिका बजावली. कार्यक्रम यशस्वी करण्यात महासंघाच्या कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे तसेच महासंघाच्या सदस्या सौ. वैशाली कोरडे, सौ. माधुरी येल्लापूरकर, सौ. उचिता निमकर आणि संस्थेच्या इतर सर्व सदस्यांनी मोलाची साथ दिली.




जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि संलग्न संस्था यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचा सोहळा ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, डोंबिवली पश्चिम येथे रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ४.०० ते ८.०० या वेळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव करत त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट महिलांच्या कार्याचा गौरव करणे व समाजात महिला सशक्तीकरणाबाबत जागरूकता निर्माण करणे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. ब्राह्मण महासंघ, डोंबिवलीचे अध्यक्ष श्री. संदीप पुराणिक यांनी महिलांच्या समाजातील योगदानावर प्रकाश टाकत महिलांनी शिक्षण, उद्योग, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात मोठे यश मिळवले असल्याचे सांगितले. तसेच महिलांचे समाजातील महत्त्व, त्यांचे कर्तृत्व आणि आजच्या काळातील महिला सशक्तीकरणाबद्दल मार्गदर्शन केले.
या महिला दिनानिमित्त डोंबिवलीमधील महिला रिक्षाचालिका व शाळा बस चालिका यांचा सत्कार करण्यात आला. सन्मानित महिलांची नावे पुढीलप्रमाणे – सौं. दिपाली राजू ठोके (रिक्षाचालिका), सौं. नयना सीताराम नाईक (रिक्षाचालिका), सौं. अनिता विलास भुजबळ (रिक्षाचालिका), सौं. दक्षता शिंगरे (रिक्षाचालिका) तसेच सौं. मनीषा भडकमकर (शाळा बस चालिका).
मानपत्र, भेटवस्तू, शेला आणि श्रीफळ देऊन या कर्तृत्ववान महिलांना गौरवण्यात आले. याप्रसंगी निमित्त सौ. मंजिरी मराठे आणि सहकारी यांचा "स्वरसंध्या" हा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते. तसेच नव्याने निवडून आलेल्या नगरसेविका सौ. मृदुला नाख्ये, सौ. आसावरी नवरे, सौ. रविना म्हात्रे, सौ. रसिक पाटील आणि नगरसेवक श्री. मंदार हळबे हे या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.
संपूर्ण सोहळ्याची जबाबदारी ब्राह्मण महासंघ, डोंबिवलीच्या सौ. गौरी धारप आणि सौ. श्रुती आठल्ये व सहकारी यांनी अतिशय शिस्तबद्ध आणि योग्य पद्धतीने पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सारंगी जोगळेकर यांनी उत्तमरित्या पार पाडले आणि शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
महिला दिनाचा हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.