EXPO 2024
EXPO 2024
EXPO 2024
EXPO 2024
EXPO 2024
EXPO 2024

EXPO 2024 - भव्य ग्राहक पेठ (प्रदर्शन आणि विक्री )

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित EXPO- 2024 ( दिनांक २३ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट सकाळी १० ते रात्री ९ वाजे पर्यंत ) ह्या भव्य ग्राहक पेठेचा उदघाटन समारंभ सोहळा हा दिनांक २३ ऑगस्ट रोजी ब्राह्मण सभा, तळ मजला हॉल, डोंबिवली पूर्व इथे मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. निखिल चितळे ( संचालक - चितळे डेअरी ) हे होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि फीत कापून प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. ह्या वेळी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, सह कार्यवाह आणि प्रकल्प प्रमुख सौ. मंजिरी देवधर, उपाध्यक्ष श्री. निलेश वीरकर, कोषाध्यक्ष श्री. जयंत कुलकर्णी, सह कोषाध्यक्ष श्री. उल्हास दाते, कऱ्हाडे सेवा मंडळ, डोंबिवली संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण नाटेकर, चित्तपावन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. माधव घुले, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा संस्थेचे कार्यवाह श्री. सुधीर बर्डे, देवरुखेकाण्व परिषद संस्थेचे कार्यवाह श्री. मधुकर कुलकर्णी, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, डोंबिवली संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष श्री. अविनाश कुळकर्णी तसेच ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे सर्व सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून दिवशी नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाला माननीय श्री. संजय घरत ( अतिरिक्त आयुक्त - पनवेल महानगर पालिका ) ह्यांनी भेट दिली.

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित EXPO - 2024 ( भव्य ग्राहक पेठ - प्रदर्शन आणि विक्री ) ला तीन दिवसांत जवळ जवळ ५००० पेक्षा जास्ती नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली आणि खरेदी केली. तसेच डोंबिवली मधील अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली.

सामुहिक श्रावणी : २०२४

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि सर्व संलग्न ब्राह्मण संस्था ( देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ, चित्तपावन ब्राह्मण संघ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभा, देवरुखे ब्राह्मण संघ, काण्व परिषद आणि ब्राह्मण सभा, डोंबिवली ) तसेच पुरोहित मंडळ डोंबिवली ( पूर्व ) सदस्य आणि देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळ, डोंबिवली पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण समाज एकत्रिकरण या दृष्टीने डोंबिवली सुरु केलेल्या सामुहिक श्रावणी कार्यक्रमाच्या भव्य आयोजन हे कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळाचे समाज मंदिर हॉल, टिळकनगर, डोंबिवली पूर्व इथे दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६.३० वाजल्या पासून करण्यात आले होते. एकूण १५५ पेक्षा जास्त सदस्यांनी श्रावणी कार्यक्रमात भाग घेतला आहे. ऋग्वेदी, कृष्ण यजुर्वेदी आणि शुक्ल यजुर्वेदी पद्धतीने श्रावणी अत्यंत विधिवत प्रकारे करण्यात आली.

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे दरवर्षी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन हे भव्य प्रमाणात करण्यात येते त्यामुळे ब्राह्मण समाजाची ताकद ही अधिक प्रमाणावर वाढण्यास मदत होत आहे.

समाज प्रबोधन कार्यक्रम - पुष्प ५ - " आचार, विचार आणि संस्कार "

" आचार, विचार आणि संस्कार " हा विषय असलेल्या समाज प्रबोधन कार्यक्रमाचे पाचवे पुष्प आज दिनांक ३० जून, २०२४ रोजी श्रोत्यांच्या उत्स्फूर्त सहभागानी पार पडले. कार्यक्रमाला ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, कोषाध्यक्ष श्री. जयंत कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य श्री. शंतनू पुराणिक, सौ. वैशाली कोरडे, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रदीप जोशी गुरुजी, कार्याध्यक्ष श्री. सुधीर बर्डे, विश्वस्त अध्यक्ष श्री. मधुकर कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री. किशोर राव तसेच यतीन पाठक इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शंतनू पुराणिक ह्यांनी आणि आभार प्रदर्शन श्री. किशोर राव ह्यांनी केले.
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने सादर होणाऱ्या समाज प्रबोधन व्याख्यान शृंखलेला नेहमीच भरघोस प्रतिसाद लाभतो.
सदर पाचवे पुष्प कार्यक्रमानिमित्ताने आचार्य 90 FM ह्या रेडिओ चॅनेल नी घेतलेली मुलाखत जरूर बघा. प्रमुख वक्ते श्री. दिलीप गोडसे गुरुजी आणि सोबत ब्राह्मण महासंघ, डोंबिवली संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री. शंतनू पुराणिक.

(विडिओ बघा )

व्याख्यानमाला : " संभवामि युगे युगे"

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिदिवसीय अध्यात्मिक व्याख्यानमाला ७ जुन ते ९ जुन अशी आयोजित केली होती. या तिन्ही दिवसासाठी सुप्रसिद्ध अर्थतज्ञ, लेखक व व्याख्याते श्री. चंन्द्रशेखर टिळक लाभले होते.

पहिल्या दिवशी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कल्याणच्या जेष्ठ व श्रेष्ठ सदस्य श्रीमान वसंतराव पुरोहित, यांना शिक्षणमहर्षी, राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार, तसेच त्यांच्या सौभाग्यवती वृंदाताई पुरोहित, यांना वेद उपासक, तसेच वेद अभ्यासासाठी डाॅक्टरेट तसेच महाराष्ट्र राज्य वैदिक परिषदेवर अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल या उभयतांचा शाल, श्रीफळ, पुष्प गुच्छ मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

प्रमुख वक्ते श्री. चन्द्रशेखर टिळक यांनी पहिल्यांदा सांगितलं की निरूपण करणे इतका मी मोठा नाही त्यामुळे हे व्याख्यान म्हणूनच आपण सर्वांनी लक्षात घ्यावे. त्यांनी पहिल्या दिवशी रामदास स्वामी ह्यांच्या विषयी विवेचन करतांना रामदास हे कसे समर्थ आहेत हे त्यांच्या ओघवत्या वाणी/शैलीत प्रेक्षकांपुढे सादर केले.

दुसऱ्या दिवशी भगवान परशुराम हा विषय होता. सप्त चिरंजीवांमध्ये परशुरामांनाच भगवान का म्हटलं जातं, हे त्यांनी सर्वांना चांगल्या पद्धतीने सांगितले, नवीन भूमी निर्माण का केली, तसंच की श्रावण बाळाची कावड आहे. त्याला परशुरामासन का म्हणतात हे टिळकांनी त्यांच्या अमोघ शैलीत सुरेख विवेचन केले.

तिसऱ्या व शेवटच्या दिवशी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कल्याण शाखेच्या दोन मान्यवर सदस्य श्रीमान मनोज पळसोदकर यांना रसायन शास्त्र विषयातील प्रबंधाबद्दल डाॅक्टरेट तसेच तरुण सदस्य श्रीमान अमित देशमुख यांना, आध्यात्मिक, ज्योतिष विषयक, तसेच कृष्ण विषयावरील प्रबंधास डाॅक्टरेट मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे श्री. अथर्व जोशी यांनी श्री. चन्द्रशेखर टिळक यांचा शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सन्मान केला.

त्यांनतर श्री. चंद्रशेखर टिळक आद्य शंकराचार्य याविषयी विवेचन करताना , अद्वैत् वाद, युद्धात राजा जिंकण्यापेक्षा प्रजा जिंकणे आवश्यक आहे व तीन दिवसांच्या व्याख्यानामध्ये तिघांची तुलना करुन या कार्यक्रमाचा समारोप केला.

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष मानस पिंगळे, देशस्थ ऋग्वेदी संघ, कल्याण अध्यक्ष सुरेशराव कुळकर्णी, कोषाध्यक्ष दिपक देशपांडे, अथर्व जोशी मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्राजक्ता आपटे, मुग्धा घाटे, शंतनु पुराणिक यांनी केले.

तीनही दिवसाला पसायदान तसंच शेवटच्या दिवशी आभार प्रदर्शन अधिवक्ता मंदार कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास विजय चाव्हरे, शंतनु पुराणिक, शुभांगी कुलकर्णी, मुग्धा घाटे, प्रमोद सांगली, जितेंद्र कांबळे तसेच दोन्ही संस्थांच्या कार्यकारणी यांनी मेहनत घेतली तसेच तिन्ही दिवस कल्याण/डोंबिवलीकर दर्दी रसिकांनी या व्याख्यानमालिकेत सहभाग नोंदविला..

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर

ब्राह्मण महासंघ,डोंबिवली आणि सर्व संलग्न ज्ञाती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच टाटा मेमोरिअल ट्रस्ट यांच्या सहकार्याने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त दिनांक १२ मे २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन हे कऱ्हाडे सेवा मंडळाच्या समाज मंदिर हॉल, टिळकनगर इथे करण्यात आले होते. सद्य उन्हाळी वातावरणात सुद्धा या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण ६९ बाटली रक्त जमा झाले. ह्याचा फायदा जवळ जवळ २५० कॅन्सर पीडित लोकांना होणार आहे. रक्तदान शिबिराचे उदघाटन हे डॉ.अरुण नाटेकर (कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ,डोंबिवली - अध्यक्ष) ह्यांच्या शुभ हस्ते झाले.

सदर रक्तदान शिबिरास सौ.अनघा बोंद्रे (महासंघ, कार्यवाह), श्री निलेश वीरकर (महासंघ,उपाध्यक्ष),श्री जयंत कुलकर्णी (महासंघ,कोषाध्यक्ष), श्री उल्हास दाते (महासंघ,सहकोषाध्यक्ष), श्री योगेश वीरकर, श्री अभिजीत कानिटकर, श्री विवेक वामोरकर,श्री संदीप पुराणीक, श्री प्रज्ञेश प्रभुघाटे, श्री अरुण कुवळेकर, सौ.माधुरी जोशी, सौ.माधुरी येल्लापूरकर, सौ. उचीता निमकर, श्री. अथर्व जोशी, आदिती जोशी (सर्व महासंघ सदस्य) आणि श्री विनायक जांभेकर (कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ,डोंबिवली - सर कार्यवाह), सौ क्षमा धामणकर, डॉ. अभय कानेटकर,श्री जे.के.जोशी (देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ - अध्यक्ष), श्री प्रशांत जोशी, सौ मनिषा धोपटकर (देवरूखे ब्राह्मण संघ - अध्यक्ष) उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यात श्री. उल्हास दाते आणि श्री. अभिजित कानिटकर ह्यांनी प्रचंड मेहनत घेतली.तसेच इतर संलग्न संस्था प्रतिनिधी श्री. गौरव जोशी, श्री. प्रदीप बाजी, सौ. पल्लवी आंबेकर, सौ. प्रतिभा दाबके, सौ. चित्रा दाक्षिणीकर, श्री. प्रदीप जोशी, श्री. नितीन जोशी, श्री प्रदीप कुलकर्णी ह्या सर्वांनी शिबीर यशस्वी करण्यात मोलाची साथ दिली.

ब्राम्हण महासंघ डोंबिवली संलग्न संस्था तसेच टाटा मेमोरिअल ट्रस्ट च्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर (विडिओ बघा )

डोंबिवलीत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद (विडिओ बघा )

डोंबिवलीत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद (विडिओ बघा )

ब्राह्मण महासंघ डोंबिवली व संलग्न ज्ञाती संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर (बातमी बघा )

डोंबिवलीत ब्राम्हण महासंघ, कऱ्हाडे ब्राम्हण सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर (बातमी बघा )

डोंबिवलीत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यात ७० रक्ताच्या पिशव्या झाल्या जमा (बातमी बघा )

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली सर्व संलग्न ज्ञाती संस्था संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद (बातमी वाचा )

स्वतंत्रता वीर सावरकर जयंती के अवसर पर डोंबिवली में रक्तदान शिविर (बातमी बघा )

जागतिक महिला दिन कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि संलग्न संस्था आयोजित जागतिक महिला दिन समारंभ रविवार दि.१० मार्च २०२४ रोजी सायं ५ ते ७ ह्या वेळेत ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, डोंबिवली पश्चिम इथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ह्या सुप्रसिद्ध निवेदिका आणि व्याख्यात्या मा.दीपाली केळकर ह्या होत्या. कार्यक्रमाला २५० पेक्षा अधिक उपस्थिती होती. ह्या कार्यक्रमाला पु. ना. गाडगीळ आणि सन्स ज्वेलर्स ह्यांचे पण सहकार्य लाभले होते.जागतिक महिला दिनाचे महत्व जाणून ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि सर्व संलग्न संस्था ह्यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रातील ६ कर्तृत्ववान महिलांचा शाल,पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यात रजनी वीरकर,रेखा नातू, वर्षा काळे, हेमांगी बोडस, अस्मिता देशपांडे,अनिता भुजबळ ह्यांचा समावेश आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यात ॲड.माधुरी बळवंत जोशी, वैशाली कोरडे, सारंगी जोगळेकर,विद्या भिडे, मनीषा धोपटकर, निलिमा चिंचणकर,अनुराधा कुलकर्णी आणि सर्व संलग्न संस्थांच्या महिला प्रतिनिधी ह्यांनी प्रचंड मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे माधुरी येल्लापूरकर ह्यांनी अतिशय सुंदर रीतीने केले. कार्यक्रमाची प्रस्तावना ही सौ. माधुरी जोशी ह्यांनी केली. सौ. अनुराधा कुलकर्णी ह्यांनी आभार प्रदर्शन केले. प्रमुख पाहुण्या सौ.दीपाली केळकर ह्यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. मा.दीपाली केळकर ह्यांनी आपल्या संवादात महिला शक्ती, स्त्री धन आणि विविध उखाणे अश्या २-३ विषयांवर जवळ जवळ दीड तासापेक्षा जास्त वेळ उत्तम निवेदन केले. ह्या कार्यक्रमाला पु. ना. गाडगीळ आणि सन्स चे उमेश स्थूळ, सुप्रिया बेहरे, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन संस्थेचे प्रदीप जोशी गुरुजी, सुधीर बर्डे, मधुकर कुलकर्णी , गौरी कुंटे,यतीन पाठक, ब्राह्मण सभेच्या कार्याध्यक्षा सुचेता पिंगळे, ब्राह्मण महासंघाच्या कार्यवाह अनघा बोन्द्रे, सदस्य शंतनू पुराणिक, देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे कार्यवाह नरेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष महाशबदे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण घराला एकत्र जोडून ठेवण्याची कला महिलांमध्ये असते, ती मानसिकता वाढायला हवी : मानस पिंगळे - https://www.lokmat.com/kalyan-dombivli/women-have-the-ability-to-hold-the-whole-house-together-that-mindset-should-be-nurtured-manas-pingale-a-a854-c941/

समाज प्रबोधन कार्यक्रम ( पुष्प ४ ) -विषय : व्रतवैकल्ये, कुल धर्म - कुळाचार, धार्मिक शंका समाधान.

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने समाज प्रबोधन कार्यक्रम ( पुष्प ४) हा दिनांक ३ मार्च २०२४ रोजी ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, डोंबिवली पश्चिम इथे श्रोत्यांच्या गर्दीत पार पडला. वेदमूर्ती श्री. प्रदीप जोशी गुरुजी ह्यांनी सहज भाषेत व्रतवैकल्ये, कुलधर्म - कुळाचार, धार्मिक शंका समाधान ह्या विषयावर अनेक दैनंदिन गोष्टींचे सोप्प्या भाषेत विश्लेषण केले आणि उपस्थित श्रोत्यांना मुद्देसूर माहिती सांगितली आणि लोकांमधून आलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. २ तासा पेक्षा जास्ती चाललेल्या ह्या कार्यक्रमाला जवळ जवळ १५० पेक्षा अधिक लोकं उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे कार्यकारिणी सदस्य श्री. शंतनू पुराणिक ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन हे ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे कोषाध्यक्ष श्री. उल्हास दाते ह्यांनी केले. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभेचे विश्वस्त अध्यक्ष श्री. मधुकर कुलकर्णी, कार्यवाह श्री. सुधीर बर्डे, ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे आणि प्रमुख वक्ते वेदमूर्ती श्री. प्रदीप जोशी गुरुजी ह्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.

ह्याला कार्यक्रमात ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे जेष्ठ , गतिमंद, अपंग, दिव्यांग अश्या निराधार व्यक्तींसाठी सुरु करण्यात आलेल्या दत्तक योजनेअंतर्गत दोन लाभार्थिंना प्रमुख वक्ते वेदमूर्ती श्री. प्रदीप जोशी गुरुजी ह्यांच्या हस्ते मदतीची अधिकृत पत्रे देण्यात आली. त्याआधी ब्राह्मण महासंघ. डोंबिवली च्या सदस्या सौ. माधुरी जोशी ह्यांनी उपस्थित सर्वांना दत्तक योजनेची माहिती दिली.

कार्यक्रमाला ब्राह्मण महासंघ, डोंबिवली च्या कार्यवाह सौ.अनघा बोन्द्रे, कोषाध्यक्ष श्री. जयंत कुलकर्णी, सदस्य श्री. विवेक वामोरकर, सौ. वैशाली कोरडे, सौ. सारंगी जोगळेकर, BBNG चे मान्यवर श्री. अरविंद कोऱ्हाळकर आणि इतर सदस्य आणि डोंबिवलीकर उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रभात फेरी

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था डोंबिवली शाखा या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावारकर यांच्या ५८ व्या आत्मार्पण दिनानिमित्त अनोखी मानवंदना देण्यासाठी दिनांक २५ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रभात फेरी डोंबिवली इथे काढण्यात आली. बाजीप्रभू चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, सावरकर रस्ता डोंबिवली पूर्व अशा मार्गाने ही फेरी काढण्यात आली . प्रभात फेरी नंतर पाच मिनिटे आपल्या मनातील सावरकर अंतर्गत त्यांच्या व्यक्तीमत्वावर बोलण्याची अनेकांना संधी देण्यात आली. ह्या प्रभात फेरीला ३०० पेक्षा जास्ती उपस्थिती होती.१०० ते १२५ शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षक डोंबिवलीकर नागरिक आणि इतर मान्यवर ह्यांचा सहभाग होता. प्रभात फेरी मध्ये - शिवाई बालक मंदिर, विद्यानिकेतन, ओंकार इंटरनॅशनल स्कूल, किड्स कट्टा, लोकमान्य गुरुकुल ह्या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रभात फेरीत राष्ट्रीय स्वयंसेवक महिलांनी सुद्धा हिरीरीने भाग घेतला होता.एकूण ७ संस्थांचे सभासद उत्स्पूर्तपणे सहभागी झाले होते.

आपल्या मनातील सावरकर ह्या अंतर्गत माधुरी याडकीकर,बिनेश नायर,अंजली बापट, नीलिमा कोडोलिकर तसेच शाळांमधून -
किड्स कट्टा शाळेतून अथर्व पाटील,
शिवाई बालक शाळेतून हर्षदा मते, दिव्या काळे, आर्या सामंत
ओंकार इंटरनॅशनल शाळेतून दिशांत अधिकारी ह्यांनी सुरेख पणे सादरीकरण केले.

स्वांतत्र्यवीर सावरकर ह्यांच्या प्रतिमेचे पूजन आणि सावरकर उद्यान स्थित अखंड सावरकर ज्योतीचे पूजन हे ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे अध्यक्ष श्री मानस पिंगळे आणि स्वातंत्र्यवीरसावरकर सामाजिक संस्था डोंबिवली शाखे चे अध्यक्ष श्री. मंगेश राजवाडे ह्यांच्या हस्ते झाले.
छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या प्रतिमेचे पूजन हे जेष्ठ नागरिक श्री.सुरेश पुराणिक ह्यांच्या हस्ते झाले.

सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ अनघा बोंद्रे, कार्यवाह - ब्राह्मण महासंघ, डोंबिवली ह्यांनी केले. ह्या प्रभात फेरीला ब्राह्मण महासंघ, डोंबिवली अध्यक्ष चे श्री. मानस पिंगळे, कार्यवाह सौ अनघा बोन्द्रे, उपाध्यक्ष श्री. अनिकेत घमंडी आणि निलेश वीरकर, कोषाध्यक्ष श्री. जयंत कुलकर्णी, सह कोषाध्यक्ष श्री. उल्हास दाते, महासंघाचे सदस्य श्री. प्रज्ञेश प्रभुघाटे, श्री. संदीप पुराणिक, श्री. विवेक वामोरकर, श्री. शंतनू पुराणिक, सौ. माधुरी जोशी, सौ. माधुरी येल्लापूरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. मंगेश राजवाडे तसेच दोन्हीही संस्थाचे अनेक सदस्य उपस्थित होते.

Watch on Youtube

Lokmat ePaper - राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर

समाज प्रबोधन कार्यक्रम पुष्प तिसरे - विषय : विवाह संस्कार

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण संघ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने समाज प्रबोधन कार्यक्रमाचे तिसरे पुष्प - विवाह संस्कार हे दिनांक २६ नोव्हेंबर रोजी ज्ञानेश्वर कार्यालय, डोंबिवली पश्चिम इथे झाले. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. प्रमुख वक्ते वेदमूर्ती श्री.विनायक भातखंडे गुरुजी ह्यांनी अतिशय सहज पद्धतीने विविध गोष्टींची सोप्प्या भाषेत माहिती दिली. कार्यक्रम सुनियोजित पणे पार पाडण्यासाठी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली कार्यकारणी सदस्य श्री. शंतनू पुराणिक, सौ. वैशाली कोरडे, श्री. अभिजित कानिटकर ह्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ब्राह्मण महासंघ, डोंबिवली च्या सर्व सदस्यांचे, उपस्थित डोंबिवलीकर तसेच शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार !

<< आधीचे उपक्रम बघा

अन्य काही उपक्रम -

 

  महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि एकत्रीकरणासाठी विविध मार्गदर्शनपर उपक्रमांचे आयोजन व बचतगटाची स्थापना

  विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

  उदयोजकांसाठी आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत विविध व्यवसाय संधी चर्चा सत्र

  समाज जागृती आणि प्रबोधन विषयक कार्यक्रम

  समाजातील ज्ञाती बांधवांसाठी गौरव सन्मान अभिनंदन कार्यक्रम