समाज प्रबोधन कार्यक्रम ( पुष्प ४ ) -विषय : व्रतवैकल्ये, कुल धर्म - कुळाचार, धार्मिक शंका समाधान.

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने समाज प्रबोधन कार्यक्रम ( पुष्प ४) हा दिनांक ३ मार्च २०२४ रोजी ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, डोंबिवली पश्चिम इथे श्रोत्यांच्या गर्दीत पार पडला. वेदमूर्ती श्री. प्रदीप जोशी गुरुजी ह्यांनी सहज भाषेत व्रतवैकल्ये, कुलधर्म - कुळाचार, धार्मिक शंका समाधान ह्या विषयावर अनेक दैनंदिन गोष्टींचे सोप्प्या भाषेत विश्लेषण केले आणि उपस्थित श्रोत्यांना मुद्देसूर माहिती सांगितली आणि लोकांमधून आलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. २ तासा पेक्षा जास्ती चाललेल्या ह्या कार्यक्रमाला जवळ जवळ १५० पेक्षा अधिक लोकं उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे कार्यकारिणी सदस्य श्री. शंतनू पुराणिक ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन हे ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे कोषाध्यक्ष श्री. उल्हास दाते ह्यांनी केले. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभेचे विश्वस्त अध्यक्ष श्री. मधुकर कुलकर्णी, कार्यवाह श्री. सुधीर बर्डे, ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे आणि प्रमुख वक्ते वेदमूर्ती श्री. प्रदीप जोशी गुरुजी ह्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.

ह्याला कार्यक्रमात ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे जेष्ठ , गतिमंद, अपंग, दिव्यांग अश्या निराधार व्यक्तींसाठी सुरु करण्यात आलेल्या दत्तक योजनेअंतर्गत दोन लाभार्थिंना प्रमुख वक्ते वेदमूर्ती श्री. प्रदीप जोशी गुरुजी ह्यांच्या हस्ते मदतीची अधिकृत पत्रे देण्यात आली. त्याआधी ब्राह्मण महासंघ. डोंबिवली च्या सदस्या सौ. माधुरी जोशी ह्यांनी उपस्थित सर्वांना दत्तक योजनेची माहिती दिली.

कार्यक्रमाला ब्राह्मण महासंघ, डोंबिवली च्या कार्यवाह सौ.अनघा बोन्द्रे, कोषाध्यक्ष श्री. जयंत कुलकर्णी, सदस्य श्री. विवेक वामोरकर, सौ. वैशाली कोरडे, सौ. सारंगी जोगळेकर, BBNG चे मान्यवर श्री. अरविंद कोऱ्हाळकर आणि इतर सदस्य आणि डोंबिवलीकर उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रभात फेरी

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था डोंबिवली शाखा या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावारकर यांच्या ५८ व्या आत्मार्पण दिनानिमित्त अनोखी मानवंदना देण्यासाठी दिनांक २५ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रभात फेरी डोंबिवली इथे काढण्यात आली. बाजीप्रभू चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, सावरकर रस्ता डोंबिवली पूर्व अशा मार्गाने ही फेरी काढण्यात आली . प्रभात फेरी नंतर पाच मिनिटे आपल्या मनातील सावरकर अंतर्गत त्यांच्या व्यक्तीमत्वावर बोलण्याची अनेकांना संधी देण्यात आली. ह्या प्रभात फेरीला ३०० पेक्षा जास्ती उपस्थिती होती.१०० ते १२५ शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षक डोंबिवलीकर नागरिक आणि इतर मान्यवर ह्यांचा सहभाग होता. प्रभात फेरी मध्ये - शिवाई बालक मंदिर, विद्यानिकेतन, ओंकार इंटरनॅशनल स्कूल, किड्स कट्टा, लोकमान्य गुरुकुल ह्या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रभात फेरीत राष्ट्रीय स्वयंसेवक महिलांनी सुद्धा हिरीरीने भाग घेतला होता.एकूण ७ संस्थांचे सभासद उत्स्पूर्तपणे सहभागी झाले होते.

आपल्या मनातील सावरकर ह्या अंतर्गत माधुरी याडकीकर,बिनेश नायर,अंजली बापट, नीलिमा कोडोलिकर तसेच शाळांमधून -
किड्स कट्टा शाळेतून अथर्व पाटील,
शिवाई बालक शाळेतून हर्षदा मते, दिव्या काळे, आर्या सामंत
ओंकार इंटरनॅशनल शाळेतून दिशांत अधिकारी ह्यांनी सुरेख पणे सादरीकरण केले.

स्वांतत्र्यवीर सावरकर ह्यांच्या प्रतिमेचे पूजन आणि सावरकर उद्यान स्थित अखंड सावरकर ज्योतीचे पूजन हे ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे अध्यक्ष श्री मानस पिंगळे आणि स्वातंत्र्यवीरसावरकर सामाजिक संस्था डोंबिवली शाखे चे अध्यक्ष श्री. मंगेश राजवाडे ह्यांच्या हस्ते झाले.
छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या प्रतिमेचे पूजन हे जेष्ठ नागरिक श्री.सुरेश पुराणिक ह्यांच्या हस्ते झाले.

सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ अनघा बोंद्रे, कार्यवाह - ब्राह्मण महासंघ, डोंबिवली ह्यांनी केले. ह्या प्रभात फेरीला ब्राह्मण महासंघ, डोंबिवली अध्यक्ष चे श्री. मानस पिंगळे, कार्यवाह सौ अनघा बोन्द्रे, उपाध्यक्ष श्री. अनिकेत घमंडी आणि निलेश वीरकर, कोषाध्यक्ष श्री. जयंत कुलकर्णी, सह कोषाध्यक्ष श्री. उल्हास दाते, महासंघाचे सदस्य श्री. प्रज्ञेश प्रभुघाटे, श्री. संदीप पुराणिक, श्री. विवेक वामोरकर, श्री. शंतनू पुराणिक, सौ. माधुरी जोशी, सौ. माधुरी येल्लापूरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. मंगेश राजवाडे तसेच दोन्हीही संस्थाचे अनेक सदस्य उपस्थित होते.

Watch on Youtube

Lokmat ePaper - राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर

समाज प्रबोधन कार्यक्रम पुष्प तिसरे - विषय : विवाह संस्कार

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण संघ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने समाज प्रबोधन कार्यक्रमाचे तिसरे पुष्प - विवाह संस्कार हे दिनांक २६ नोव्हेंबर रोजी ज्ञानेश्वर कार्यालय, डोंबिवली पश्चिम इथे झाले. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. प्रमुख वक्ते वेदमूर्ती श्री.विनायक भातखंडे गुरुजी ह्यांनी अतिशय सहज पद्धतीने विविध गोष्टींची सोप्प्या भाषेत माहिती दिली. कार्यक्रम सुनियोजित पणे पार पाडण्यासाठी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली कार्यकारणी सदस्य श्री. शंतनू पुराणिक, सौ. वैशाली कोरडे, श्री. अभिजित कानिटकर ह्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ब्राह्मण महासंघ, डोंबिवली च्या सर्व सदस्यांचे, उपस्थित डोंबिवलीकर तसेच शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार !

भव्य भोंडला 2023

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि सर्व संलग्न संस्था आयोजित भव्य भोंडला कार्यक्रमाचे आयोजन हे मंगळवार, दिनांक १७ ऑक्टोबर, २०२३ रोजी ब्राह्मण सभा, डोंबिवली इथे करण्यात आले होते. एकत्रित येऊन आपली परंपरा वाढविणे आणि संस्कृती जपण्याच्या दृष्टीने डोंबिवली मध्ये ब्राह्मण महासंघ आणि सर्व संलग्न संस्था ह्या एकत्र मिळून विविध कार्यक्रम करण्यात पुढाकार घेत आहेत.

प्रचंड मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देत महिला वर्ग भोंडला कार्यक्रमासाठी उपस्थित होता.
ब्राह्मण सभा कार्याध्यक्षा सौ.सुचेता ताई पिंगळे,ब्राह्मण महासंघ, डोंबिवली कार्यवाह सौ.अनघा बोंद्रे,ब्राह्मण सभा महिला समिती प्रमुख सौ.विद्या भिडे,ब्राह्मण महासंघ, डोंबिवली महिला समिती प्रमुख ॲड. सौ.माधुरी जोशी आणि सुरुची केटरर्स च्या सौ.भाग्यश्री प्रभुघाटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन भोंडला कार्यक्रमाची सुरुवात झाली. भोंडला कार्यक्रमा मध्ये एकूण ५ स्पर्धा ठेवल्या होत्या. १. उत्कृष्ट सादरीकरण, २. उत्कृष्ट गाणे, ३. उत्कृष्ट वेशभूषा,४. उत्कृष्ट हत्ती सजावट आणि ५. लक्षवेधी वेशभूषा. सर्व ज्ञाती संस्थेच्या संघाने दिलेल्या वेळेमध्ये उत्कृष्ट पणे भोंडला सादरीकरण केले. भोंडला कार्यक्रमाची बक्षिसे ही -

उत्कृष्ट वेशभूषा कऱ्हाडे ब्राह्मण संघ
उत्कृष्ट गाणी ब्राह्मण सभा
उत्कृष्ट हत्ती सजावट चित्तपावन संघ
उत्कृष्ट सादरीकरण देवरुखे संघ
लक्षवेधी वेशभूषा बक्षीस -आरती म्युनिश्वर( अहिल्या च्या वेशभू्षेसाठी )

उपस्थित परीक्षकांनी उरलेल्या तीन संघांना सुद्धा भोंडला कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर केले.

भोंडला चा शेवट हा नेहमी खिरापत ओळखून होतो. तसाच एक खेळ कार्यक्रमात घेतला गेला.प्रत्येक संघाने आपली खिरापत आणली होती आणि तो संघ सोडून इतरांनी ती ओळखायची होती व त्यालाही बक्षीस होते.

भोंडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे महासंघाच्या कार्यकारिणी सदस्या आदिती जोशी यांनी केले.
परीक्षक म्हणून अनुराधा ताई मोहीदेकर,अनुराधा ताई फाटक आणि प्रतिभा ताई बिवलकर ह्या लाभल्या होत्या. तर वेळ नियंत्रक म्हणून शुभांगी ताई दूनाखे आणि पल्लवी आंबेकर यांनी उत्कृष्ट भूमिका निभावली. महिलांमधील सुप्त कला, गुणांना वाव हा हे भोंडला कार्यक्रमामुळे मिळाला. अतिशय सुंदर आणि हटके सादरीकरण तसेच वेग वेगळे विषय घेवून प्रत्येक संघाने भोंडल्याची गाणी ही खूपच छान पद्धतीने बसवली होती. आयोजक म्हणून ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे ॲड माधुरी जोशी आणि ब्राह्मण सभा, डोंबिवली तर्फे विद्या भिडे यांनी या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतली.
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, ब्राह्मण सभा, डोंबिवली चे संयुक्त कार्यवाह श्री. प्रदीप गोसावी, मृणाल सबनीस, श्रीपाद कुलकर्णी, देवरुखे संस्थेच्या अध्यक्षा मनीषा धोपटकर, तसेच सर्व संलग्न संस्थाचे पदाधिकारी हे कार्यक्रमाला उपस्थित होते.

भविष्यात वेग वेगळे कार्यक्रम हे आणखी मोठ्या प्रमाणात ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि सर्व संलग्न संस्था मिळून करणार असून त्यायोगे सर्व ज्ञाती समाज अधिक प्रमाणात एकत्रित होण्यास निश्चित मदत होणार आहे.

EXPO 2023 - भव्य ग्राहक पेठ (प्रदर्शन आणि विक्री )

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित EXPO- 2023 ( दिनांक ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर, सकाळी १० ते रात्री ९ वाजे पर्यंत ) ह्या भव्य ग्राहक पेठेच्या ( प्रदर्शन आणि विक्री ) उदघाटन समारंभाचा सोहळा हा दिनांक ८ सप्टेंबर रोजी ब्राह्मण सभा, तळ मजला हॉल, डोंबिवली पूर्व इथे मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुनील कुराडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त ( वाहतूक विभाग ) श्री. मंदार धर्माधिकारी हे होते. पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते हे विशेष आमंत्रित होते. दोन्ही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि फीत कापून प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. ह्या वेळी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे, सह कार्यवाह आणि प्रकल्प प्रमुख सौ. मंजिरी देवधर, उपाध्यक्ष श्री. अनिकेत घमंडी आणि श्री. निलेश वीरकर, कोषाध्यक्ष श्री. जयंत कुलकर्णी, सह कोषाध्यक्ष श्री. उल्हास दाते, कऱ्हाडे सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण नाटेकर, चित्तपावन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. माधव घुले, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष श्री. मधुकर कुलकर्णी, कार्यवाह श्री. सुधीर बर्डे, देवरुखे संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनीषा धोपटकर, काण्व परिषद संस्थेचे कार्यवाह श्री. मधुकर कुलकर्णी, कल्याण जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. सचिन आंबेकर तसेच ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे सर्व सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाला ABP माझा च्या ज्ञानदा कदम तसेच भारतीय डिजिटल पार्टी ( You tube channel ) चे श्री. अमेय कदम ह्यांनी भेट दिली. ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित EXPO - 2023 ( भव्य ग्राहक पेठ - प्रदर्शन आणि विक्री ) च्या आज दुसऱ्या दिवशी दिनांक ९ सप्टेंबर रोजी नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. सर्व स्टॉल वर प्रचंड गर्दी होती.

प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सौ. सायली मुतालिक ( Managing Director - ParaForce HR Services Pvt. Ltd, महिला उद्योजक आघाडी प्रमुख भारतीय जनता पार्टी- महाराष्ट्र राज्य ) ह्यांनी प्रदर्शनाला विशेष भेट दिली आणि सर्वांचे कौतुक केले. सौ. सायली मुतालिक ह्यांच्या हस्ते ह्या वेळी सर्व स्टॉल धारकांचा सन्मान करण्यात आला.

तसेच देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्थेचे अध्यक्ष श्री. जगन्नाथ जोशी, विश्वस्त अध्यक्ष श्री. अविनाश कुलकर्णी ह्यांच्या हस्ते प्रायोजकांचा सन्मान करण्यात आला.

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित EXPO - 2023 ( भव्य ग्राहक पेठ - प्रदर्शन आणि विक्री ) च्या तिसऱ्या दिवशी दिनांक १० सप्टेंबर रोजी पण नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. सर्व स्टॉल वर सतत गर्दी होती. प्रदर्शन हे अतिशय भव्य प्रमाणात आणि नियोजित पणे संपन्न झाले. अडीच दिवसांत ४५०० पेक्षा जास्ती नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली आणि खरेदी केली.

प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी ब्राह्मण सभा, डोंबिवली चे अध्यक्ष डॉ. विनय भोळे, Gallop गिफ्ट चे श्री. प्रदीप जोशी, IAS श्री. विजय जोशी, मान्यवर श्री विश्वजित देशपांडे, श्री. सच्चीदानंद शेवडे अश्या अनेक नावाजलेल्या लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली.

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे आयोजित करण्यात आलेले प्रदर्शन EXPO - 2023 म्हणजे एक शानदार सोहळा होता.

गर्भाधान संस्कार ते उपनयन संस्कार

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा, डोंबिवली ह्यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित केलेल्या समाज जागृती आणि समाज प्रबोधनपर गर्भाधान संस्कार ते उपनयन संस्कार या व्याख्यानामध्ये गर्भाधान, पुसंवन सीमांतोन्नयन, जातकर्म,नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, कर्णभेद, विद्यारंभ, उपनयन, वेदारंभ समावर्तन, विवाह, अंत्येष्टी अश्या विविध मुद्दयांवर प्रमुख वक्ते श्री. मुकुंद जोशी गुरुजी ह्यांनी उपस्थित श्रोत्यांना सखोल माहिती दिली. मुकुंद जोशी गुरुजी ह्यांनी व्याख्यानाची सुरवात ही संस्कार म्हणजे काय ह्या मुद्द्यावर भर देऊन केली

संस्कार म्हणजे चांगलं निर्माण करणे.. संस्कारांमुळे व्यक्तीचं मन आणि मस्तिष्क पवित्र होते . सुशिक्षित व्यक्ती ही स्वतः ची व स्वतःच्या कुटुंबाची प्रगती करू शकतो, पण सुसंस्कारित व्यक्ती ही स्वतः सोबत समाजाची प्रगती करू शकतो. आपल्या पूर्वजांनी समाज सुसंस्कारित व्हावा म्हणून काही मार्गदर्शन केले आहे, ते म्हणजे सोळा संस्कार...

१) गर्भाधान संस्कार - अनेक ठिकाणी ऋतुशांती किंवा रजोदर्शन शांती असे म्हणतात. ज्या वेळी कुमरिकेला स्रित्व प्राप्त होतं त्या वेळेस काही दोष असतील तर ते निवारणासाठी हा संस्कार केला जातो
२) पुसंवन - गर्भधारणा झाल्यावर गर्भ व मातेची पकृत्ती स्थिर राहण्यासाठी हा संस्कार करतात.
३) सिमंतोनयन - गर्भवती स्त्री व गर्भ प्रसन्न राहण्यासाठी , स्रीचे डोहाळे पुरवण्यासाठी तसेच गर्भाच्या सर्वांगी विकासासाठी हा म्हणजेच डोहाळे जेवण संस्कार करतात.
४) जातकर्म - ह्या संस्कारात बाळ जन्माला आल्यावर नाळ छेदनापूर्वी बाळाला वडिलांनी सोन्याच्या तारेने मध चाटवले जाते.
५) नामकरण - ह्या जीवर्म्याने मागील जन्माची ओळख पुसली असते, ह्या जन्मात त्याला त्याची नवीन ओळख मिळवून देण्यासाठी हा संस्कार आहे.
६) निष्क्रमण - बाळाच्या बल, बुद्धी, आयुष्याच्या विकासासाठी सूर्य देवाचे दर्शन व्हावे म्हणून मंदिरात नेतात.
७) अन्नप्रशान - बाळाच्या शारीरिक, मानसिक, व भावनिक विकासासाठी षडरस अन्नाची चव दिली जाते.
८) कर्णभेद - जीवनात स्थिरता प्राप्त होण्यासाठी व राहू ग्रह शांत राहण्या साठी मुलगा असो वा मुलगी कान टोचतात.
९) चौल/ चुडा कर्म - पूर्व जन्माचे पातक नाश होण्यासाठी हा संस्कार म्हणजे जाऊळ हा संस्कार करतात.
१०) विद्यारंभ - बालकाला अक्षर ओळख होण्यासठी हा संस्कार सांगितलं आहे.
११) उपनयन संस्कार - हा कुमारांसाठीचा मुख्य संस्कार आहे. ब्रम्हचर्य व्रताचे पालन करून उत्तम ज्ञानार्जन करण्यासाठी हा संस्कार आहे. गायत्री मंत्राचा उपदेश घेऊन यज्ञपवित ( जानवे ) घालतात. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो तसेच वैदिक धर्मात सांगितलेली कर्मे करण्याचा अधिकार प्राप्त होतो.

व्याख्यानाला ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा अध्यक्ष श्री. प्रदीप जोशी गुरुजी, विश्वस्त अध्यक्ष श्री. मधुकर कुलकर्णी, कार्यवाह श्री. सुधीर बर्डे, कऱ्हाडे सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण नाटेकर तसेच डोंबिवली मधील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन हे श्री. शंतनू पुराणिक ह्यांनी केले. आभार प्रदर्शन हे सौ. माधुरी जोशी ह्यांनी केले.

दिनांक ३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५.३० ते ७.३० ह्या वेळेत ज्ञानेश्वर कार्यालय, डोंबिवली पश्चिम इथे ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित होणाऱ्या "गर्भाधान संस्कार त

सामुहिक श्रावणी

दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि सर्व संलग्न ब्राह्मण संस्था ( देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ, चित्तपावन ब्राह्मण संघ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभा, देवरुखे ब्राह्मण संघ, काण्व परिषद आणि ब्राह्मण सभा, डोंबिवली ) तसेच पुरोहित मंडळ ( डोंबिवली पूर्व ) आणि देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळ, डोंबिवली ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण समाज एकत्रिकरण या दृष्टीने डोंबिवली मध्ये पहिले पाऊल म्हणून प्रथमच सामुहिक श्रावणी कार्यक्रमाचे भव्य आयोजन हे कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळाचे समाज मंदिर हॉल, टिळकनगर, डोंबिवली पूर्व इथे सकाळी ७ वाजल्या पासून करण्यात आले होते. एकूण २२५ पेक्षा जास्ती सदस्यांनी श्रावणी कार्यक्रमात भाग घेतला आहे. ऋग्वेदी, कृष्ण यजुर्वेदी आणि शुक्ल यजुर्वेदी पद्धतीने श्रावणी अत्यंत विधिवत प्रकारे करण्यात आली. ब्राह्मण समाज एकत्रिकरण दृष्टीने महत्वाचे पाऊल हे ब्राह्मण महासंघा तर्फे डोंबिवली मध्ये रोवण्यात आले.

https://youtu.be/7eIMg-PF-O0?si=JP89aUekVwp9mxQb

ब्राह्मण महासंघ डोंबिवली यांच्या वतीने श्रावणी कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच एकीचे दर्शन | एकूण २२५ पेक्षा जास्त सदस्यांनी श्रावणी कार्यक्रमात भाग घेतला आहे. ऋग्वेदी, कृष्ण यजुर्वेदी आणि शुक्ल यजुर्वेदी पद्धतीने श्रावणी अत्यंत विधिवत प्रकारे करण्यात आली. | संपूर्ण बातमी

ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि सलंग्न संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने सामूहिक श्रावणी आयोजन संपन्न. | संपूर्ण बातमी

नित्य नैमित्तीक धार्मिक कार्य आणि आपण

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ जून २०२३ रोजी" नित्य नैमित्तीक धार्मिक कार्य आणि आपण " ह्या विषयावर पहिल्या चरणाच्या समाज प्रबोधन कार्यक्रमाची यशस्वी पणे सांगता ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, डोंबिवली पश्चिम इथे झाली. प्रमुख वक्ते श्री. सचिन ठाकुरदेसाई ( अध्यक्ष - पुरोहित मंडळ, डोंबिवली पूर्व ) ह्यांनी अतिशय सहज सुंदर भाषेत विविध नित्य धार्मिक कार्याची माहिती आणि आवश्यकता सर्व श्रोत्यांना समजावून सांगितली. डोंबिवली मधील बऱ्याच जेष्ठ आणि मान्यवर नागरिक ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. विविध प्रकारचे समाज प्रबोधन आणि जागृती कार्यक्रम दर दोन महिन्यांनी दोन्हीही संस्था संयुक्त विद्यमाने करणार आहेत. कार्यक्रमाला ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, शुक्ल यजुर्वेदी संस्थेचे विश्वस्त अध्यक

 

<< आधीचे उपक्रम बघा