विविध उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चा एक शैक्षणिक उपक्रम

दिनांक ६ मे २०२३ रोजी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे ज्ञानमंदिर विद्यासंकुलाच्या कोतकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवली इथे विद्यार्थ्यांना टेबल टेनिस टेबल आणि इतर साहित्य भेट देण्यात आले. सदर भेट ही महासंघाचे हितचिंतक श्री. अभिजित वैद्य ह्यांच्या माध्यमातून वैद्य कुटुंबीय ह्यांच्या तर्फे भालचंद्र वैद्य ह्यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात आली. ह्या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता पाखले, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे, सह कोषाध्यक्ष श्री. उल्हास दाते, कार्यकारिणी सदस्य सौ. माधुरी जोशी तसेच विद्यालयाचे शिक्षक आणि इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. शाळेतर्फे ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे आभार मानले.

http://www.nyayranbhumi.com/2023/05/blog-post_71.html
https://marathi.mumbaiaaspaas.com/table-tennis-table-other-materials-provided-to-kotkar-school-by-brahmin-federation/

मानसिक आरोग्य आणि समस्या माहिती सत्र

दिनांक १५ एप्रिल २०२३ रोजी, ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित मानसिक आरोग्य आणि समस्या ह्या माहिती सत्र कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. प्रमुख वक्त्या सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ व समुपदेशक सौ. वृषाली आठल्ये ह्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थित नागरिक बंधू भगिनी ह्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले तसेच विचारलेल्या सर्व प्रश्नांना / समस्यांना सविस्तर उत्तरे दिली. कार्यक्रम प्रमुख म्हणून ब्राह्मण महासंघ, डोंबिवली कार्यकारणी सदस्य सौ. माधुरी जोशी ह्यांनी उत्तम प्रकारे नियोजन केले. महासंघाचे कार्यकारिणी सदस्य श्री. योगेश वीरकर, श्री. अभिजित कानिटकर, सौ. उचिता निमकर, सौ.आदिती जोशी, इतर सदस्य सौ. विदुला वामोरकर, सौ.रुपाली उपाध्ये , सौ. अश्विनी मुजुमदार ह्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाची साथ दिली. ह्यावेळी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे, उपाध्यक्ष श्री. अनिकेत घमंडी, महासंघाचे माजी अध्यक्ष श्री. प्रज्ञेश प्रभुघाटे तसेच चित्तपावन संस्थेचे कार्याध्यक्ष आणि महासंघाचे सल्लागार सदस्य श्री. माधव घुले, देवरुखे संस्थेच्या अध्यक्षा आणि महासंघाच्या सल्लागार सदस्य सौ. मनीषा धोपटकर तसेच महासंघाच्या इतर संलग्न संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ह्या कार्यक्रमासाठी श्री. माधव घुले ह्यांनी सर्व बहुमोल्य मदत केली ह्या बद्दल त्यांचे मनापासून आभार ! कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माधुरी जोशी ह्यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. वैशाली कोरडे ह्यांनी दिला. आभार प्रदर्शन हे कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे ह्यांनी केले.

विविध व्यवसाय संधी आणि सरकारी योजना

दिनांक १९ मार्च २०२३ रोजी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि ब्राह्मण सभा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत विविध व्यवसाय संधी आणि सरकारी योजना ह्या विषयाबाबत माहिती सत्राचे आयोजन हे ब्राह्मण सभा, पहिला मजला इथे करण्यात आले होते. प्रमुख वक्ते म्हणून श्री. प्रदीप पेशकार ह्यांनी उपस्थितांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले तसेच विविध सरकारी योजना आणि व्यवसाय संधी या बाबत सविस्तर माहिती दिली. ह्यावेळी जवळ जवळ २०० पेक्षा अधिक सर्व श्रेणी व्यावसायिक / उद्योजक / नागरिक ह्यांनी माहिती सत्राचा लाभ घेतला. ह्यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. विनय भोळे, ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, ब्राह्मण महासंघ कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे तसेच ब्राह्मण सभा आणि ब्राह्मण महासंघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. महासंघाचे सदस्य श्री. योगेश वीरकर ह्यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण महासंघाचे कोषाध्यक्ष श्री. जयंत कुलकर्णी आणि कार्यकारिणी सदस्य श्री. विवेक वामोरकर ह्यांनी उत्तम प्रकारे आयोजन आणि नियोजन केले.

भव्य भोंडला

ब्राह्मण महासंघ डोंबिवली आयोजित भव्य भोंडला दिनांक १ ऑक्टोंबर २०२२ रोजी शुभम हॉल, डोंबिवली पूर्व इथे अतिशय उत्साहात पार पडला. प्रचंड गर्दी आणि उत्साही वातावरण अनुभवला मिळाले.सगळ्या वयाच्या महिला एकत्रित येवून एकच वेळी एखाच ठिकाणी फेर धरत होत्या.भारतीय संस्कृती, परंपरा कुठेतरी लोप पावत आहे आणि नवीन पिढीला हे भोंडला खेळ माहीत होणे अतिशय गरजेचे आहे हे दाखवण्याचा हा महासंघ चा प्रयत्न होता. कलर्स मराठी वहिनी वरील सूर नवा ध्यास नवा ची कलाकार सई जोशी हिची प्रमुख उपस्थिती होती. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे ह्यांनी भोंडला कार्यक्रमाचे उदघाटन केले आणि उपस्थित महिलांना भोंडला आणि हत्ती ह्याचे महत्व सांगितले. उत्कृष्ट सादरीकरण साठी घे भरारी ग्रुप ने बक्षीस पटकावले. उत्कृष्ट लक्षवेधी वेशभूषा साठी शु.य.मा.ब्राह्मण सभेचे मुक्ताई महिला मंडळाला बक्षिस मिळविले. उत्कृष्ट गीत जे स्वयं रचित आणि सामाजिक जाणीव करून देणारे होते या साठी जिजाऊ ग्रुप ने बक्षीस मिळवले. आपल्या गीतातून सादरीकरणातून नव्या जुन्याची सांगड घालत लक्षवेधी सादरीकरण यासाठी देवरूखे ब्राह्मण संघाने बक्षिसावर आपला हक्क मिळवला.कालच्या भोंडल्यात काही विशेष आणि लक्षवेधी क्षण अनुभवायला मिळाले. ९२ वर्षाच्या आजींनी इथे फेर धरला. तसेच ८२ वर्षाच्या आजी लहान मुलीच्या भूमिकेत परकल पोलके घालून दोन वेण्या घालून आल्या आणि त्यांनीही फेर धरला. संधीवातामुळे दोन्ही गुढगे वाकलेले असतानाही एका ८० वर्षांच्या महिलेने ग्रुप मध्ये फेर धरला आणि ग्रुपला बक्षीसही मिळवून दिले.लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. जवळ जवळ २७५ पेक्षा जास्ती महिलांनी सहभाग घेतला होता. महासंघाच्या कार्यकारणी च्या कार्यवाह अनघा बोन्द्रे, कोषाध्यक्ष जयंत कुलकर्णी,सह कोषाध्यक्ष उल्हास दाते, उपाध्यक्ष अनिकेत घमंडी आणि इतर सदस्य विनायक जांभेकर, शंतनू पुराणिक, विवेक वामोरकर, योगेश वीरकर, मृणाल सबनीस,अभिजित कानिटकर ह्यांनी भोंडला यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. महासंघाचे उपाध्यक्ष अनिकेत घमंडी ह्यांनी ह्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले. महिला समिती प्रमुख माधुरी जोशी ह्यांच्या नेतृत्वाखाली वैशाली कोरडे,क्षमा धामणकर आणि महिला समितीने अतिशय उत्तम प्रकारे कार्यक्रमाची जबाबदारी यशस्वी पणे पार पाडली. तसेच भोंडल्याची गायन टीम ज्यात सुरेखा जोशी,माधुरी एल्लाबादकर , दिवेकर काकु,जयश्री कुलकर्णी काकु,ताम्हणे काकु आणि अर्चना खेर ह्यांचा सहभाग ही अतिशय महत्वाचा होता आणि सगळ्यांनी आपली भूमिका चोख बजावली आणि कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. सगळ्यांचे मनापासुन अभिनंदन!!!

https://youtu.be/7jh7SlCgvzg

स्वरपंचमी

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे शुक्रवार,२ डिसेंबर २०२२ रोजी स्वरपंचमी ह्या सांगीतीक कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली इथे करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम आणि नागरी पुरवठा मंत्री माननीय नामदार श्री. रवींद्र चव्हाण साहेब ह्यांची उपस्थिती लाभली. श्री. रवींद्र चव्हाण साहेब ह्यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलाने करण्यात आली. ह्या प्रसंगी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे,कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे, डोंबिवलीकर मासिकाचे कार्यकारी संपादक श्री. प्रभू कापसे,संगीतकार कमलेश भडकमकर उपस्थित होते.तसेच ब्राह्मण महासंघाचे उपाध्यक्ष श्री. निलेश वीरकर, श्री. अनिकेत घमंडी, इतर सदस्य श्री. प्रज्ञेश प्रभुघाटे , श्री. संदीप पुराणिक श्री.योगेश वीरकर, श्री. विनायक जांभेकर, श्री. उल्हास दाते, श्री. अभिजित कानिटकर सौ. माधुरी जोशी, सौ. वैशाली कोरडे, सौ. मंजिरी देवधर हे उपस्थित होते. माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण साहेब ह्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि सर्व लिटिल चॅम्प गायकांना आशिर्वाद दिले. श्री. रवींद्र चव्हाण साहेब ह्यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणाऱ्या अनघा मोडक ह्यांना डोंबिवलीत कार्यक्रमाला परत डोंबिवलीकर परिवारातर्फे कार्यक्रमाला येण्यासाठी विनंती केली.अतिशय उत्तम आणि बहारदार असा कार्यक्रम झाला. सारेगमप लिटिल चॅम्प च्या ह्या सुमधुर मैफलीला डोंबिवलीकर ( एक सांस्कृतिक परिवार ) मुख्य प्रयोजक होते. तसेच पितांबरी प्रॉडक्ट्स, मेगा सर्व्हिसेस हे सह प्रयोजक होते. इतर प्रयोजकांमध्ये ग्लोब ग्रुप, गॅलप गिफ्ट, हेमंत सुगंधी भांडार, लोकमान्य मल्टी बँक आणि श्री स्वामी समर्थ के टरर्स होते. कार्यक्रमाला जवळ जवळ ५०० पेक्षा जास्त रसिक प्रेक्षक उपस्थित होते. ब्राह्मण महासंघ, डोंबिवली ह्या अग्रगण्य संस्थेने सांस्कृतिक परिवारात एक मानाचे स्थान मिळविले.

मोफत आधार कार्ड शिबीर आणि पोस्टाच्या विविध योजना

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि देवरुखे ब्राह्मण संघ डोंबिवली ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि टिळक नगर पोस्ट ऑफिस च्या सहकार्याने लहान मुलांसाठी मोफत आधार कार्ड शिबीर आणि पोस्टाच्या विविध योजना अश्या दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी घेतलेल्या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला. एकूण ७० लाभार्थिनी ह्यात भाग घेतला. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन हे देवरुखे ब्राह्मण संघातर्फे करण्यात आले होते. महासंघाचे सदस्य श्री. संदीप पुराणिक ह्यांनी कार्यक्रम ठरवून पुढे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महासंघाच्या इतर सदस्यांनी कार्यक्रमात मोलाचे योगदान दिले. महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे,उपाध्यक्ष श्री. अनिकेत घमंडी आणि श्री. निलेश वीरकर, कोषाध्यक्ष श्री. जयंत कुलकर्णी, सह कोषध्यक्ष श्री. उल्हास दाते, सह कार्यवाह सौ. मंजिरी देवधर, सल्लागार मंडळ सदस्य श्री. प्रशांत जोशी तसेच महासंघाचे इतर सदस्य सौ. उचिता निमकर, सौ. वैशाली कोरडे, सौ. माधुरी जोशी, आणि श्री. प्रज्ञेश प्रभुघाटे ह्यांनी सहभाग घेतला. सर्वांचे मनःपूर्वक आभार!!

https://youtu.be/DI9w9ye43Jo

सहकारी गृहनिर्माण संस्था – पुनर्विकास चर्चा

दिनांक ९ ऑक्टोबर २०२२ रोजी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित सहकारी गृहनिर्माण संस्था - पुनर्विकास चर्चा सत्राला उदंड प्रतिसाद लाभला. ३०० पेक्षा जास्त सोसायटी धारकांनी ह्या चर्चा सत्राला उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे उदघाटन हे महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे ह्यांनी केले. ३ तासापेक्षा जास्त वेळ चाललेल्या ह्या चर्चा सत्रात श्री. माधव चिकोडी, श्री. केशव चिकोडी तसेच वरिष्ठ वकील श्री. श्रीनिवास घैसास ह्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. सर्व नागरिकांनी परत असे चर्चा सत्र ब्राह्मण महासंघ, डोंबिवली ह्यांनी आयोजित करावे ह्या साठी आग्रह धरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महासंघाचे सदस्य श्री. शंतनू पुराणिक ह्यांनी एक हाती सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले. उपाध्यक्ष श्री. अनिकेत घमंडी ह्यांची प्रबळ साथ मिळाली. महासंघाच्या कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे ह्यांनी आभार प्रदर्शन केले. महासंघाचे सदस्य जयंत कुलकर्णी, विवेक वामोरकर, उल्हास दाते, अभिजीत कानिटकर, मंजिरी देवधर, वैशाली कोरडे, मृणाल सबनीस आणि योगेश वीरकर ह्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाची साथ दिली.

https://youtube.com/playlist?list=PLHf6ggUmfCrBZhjkOJMkOaVFiKRMykaht

EXPO 2022

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित EXPO 2022 प्रदर्शनाचे उदघाटन आज १९ ऑगस्ट रोजी श्री. राजेंद्र हुंजे ह्यांच्या हस्ते झाले. सर्व प्रकारच्या ग्राहकोपयोगी वस्तूंचे हे प्रदर्शन १९ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट ह्या दरम्यान ब्राह्मण सभा डोंबिवली पूर्व इथे होत आहे. प्रदर्शनाच्या उदघाटनाला ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे ह्यांनी सर्व नागरिकांना प्रदर्शनास भेट देण्याचे तसेच वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहन केले. उदघाटन सोहळ्यास ब्राह्मण महासंघाचे कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे, उपाध्यक्ष श्री. निलेश वीरकर, कोषाध्यक्ष श्री जयंत कुलकर्णी, सह कोषाध्यक्ष श्री उल्हास दाते, प्रदर्शन प्रमुख श्री विवेक वामोरकर, सह कार्यवाह सौ मंजिरी देवधर, माजी अध्यक्ष श्री प्रज्ञेश प्रभुघाटे, देशस्थ ऋग्वेदी संघाचे अध्यक्ष श्री जे के जोशी, विश्वस्त अध्यक्ष श्री अविनाश कुलकर्णी, देवरुखे संघांचे अध्यक्ष श्री प्रशांत जोशी, BBNG चे श्री अरविंद कोऱ्हाळकर, तसेच महासंघाचे इतर सदस्य श्री अभिजित कानिटकर, श्री विनायक जांभेकर, श्री योगेश वीरकर, सौ उचिता निमकर, सौ क्षमा धामणकर, सौ मृणाल सबनीस, श्री शंतनू पुराणिक, सौ वैशाली कोरडे आणि सौ माधुरी जोशी आणि नागरिक बऱ्याच संख्येनी उपस्थित होते.

https://youtu.be/eWOXwF9ekNA

मोफत आयुर्वेदिक उपचार सल्ला तसेच रक्त्त तपासणी शिबिर

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित सिमसार आयुर्वेद रुग्णालय व चिकित्सालय तसेच श्री पॅथॉलॉजी लॅब यांच्या मार्फत आणि देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ संस्थेच्या सहकार्याने सर्व प्रकारच्या रोगांसाठी मोफत आयुर्वेदिक उपचार सल्ला तसेच रक्त्त तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक २६ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजे पर्यंत करण्यात आले होते. देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे अध्यक्ष श्री. जे के जोशी ह्याच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष श्री अविनाश कुलकर्णी, कार्यवाह श्री. नरेश कुलकर्णी उपस्थित होते. शुक्ल यजुर्वेदी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रदीप जोशी, श्री. सच्चीदानंद शेवडे, महासंघाचे माजी अध्यक्ष श्री. प्रज्ञेश प्रभुघाटे आदी मान्यवरांनी शिबिरास भेट दिली. एकूण ११० लोकांनी रक्त तपासणी करून घेतली तसेच जवळ जवळ ४५ नागरिकांनी मोफत आयुर्वेदिक उपचार सल्ला हा तज्ञ डॉक्टरांकडून घेतला. सामाजिक बांधिलकी वाढविण्यात ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चा नेहमीच अग्रक्रम राहिला आहे. महासंघातर्फे सर्व पदाधिकारी, सभासद, सिमसार चिकित्सलाय, श्री पॅथॉलॉजी लॅब आणि देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे हार्दिक अभिनंदन आणि आभार!!

भव्य रक्तदान शिबिर

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि रोटरी विश्वनाथ मेमोरियल हेल्थ फाउंडेशन या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आणि सायन हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती समर्पित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन २९ मे २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३वाजे पर्यंत श्री. गोविंदानंद श्रीराम मंदिर ट्रस्ट ( श्री. स्वामी समर्थ मठ ) रामनगर, डोंबिवली येथे आयोजित करण्यात करण्यात आले होते. ह्या रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला. एकूण ९४ बाटल्या रक्त जमा झाले. आणखी रक्तदाते हे रक्तदान करण्यासाठी उत्सुक होते. ब्राह्मण महासंघ, डोंबिवली च्या सर्व सदस्यांचे, रोटरी विश्वनाथ मेमोरियल ट्रस्ट च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार!!

https://youtu.be/cE_SZPHIOwE