ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि सर्व संलग्न संस्था आयोजित भव्य भोंडला कार्यक्रमाचे आयोजन हे मंगळवार, दिनांक १७ ऑक्टोबर, २०२३ रोजी ब्राह्मण सभा, डोंबिवली इथे करण्यात आले होते. एकत्रित येऊन आपली परंपरा वाढविणे आणि संस्कृती जपण्याच्या दृष्टीने डोंबिवली मध्ये ब्राह्मण महासंघ आणि सर्व संलग्न संस्था ह्या एकत्र मिळून विविध कार्यक्रम करण्यात पुढाकार घेत आहेत.
प्रचंड मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देत महिला वर्ग भोंडला कार्यक्रमासाठी उपस्थित होता.
ब्राह्मण सभा कार्याध्यक्षा सौ.सुचेता ताई पिंगळे,ब्राह्मण महासंघ, डोंबिवली कार्यवाह सौ.अनघा बोंद्रे,ब्राह्मण सभा महिला समिती प्रमुख सौ.विद्या भिडे,ब्राह्मण महासंघ, डोंबिवली महिला समिती प्रमुख ॲड. सौ.माधुरी जोशी आणि सुरुची केटरर्स च्या सौ.भाग्यश्री प्रभुघाटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन भोंडला कार्यक्रमाची सुरुवात झाली. भोंडला कार्यक्रमा मध्ये एकूण ५ स्पर्धा ठेवल्या होत्या. १. उत्कृष्ट सादरीकरण, २. उत्कृष्ट गाणे, ३. उत्कृष्ट वेशभूषा,४. उत्कृष्ट हत्ती सजावट आणि ५. लक्षवेधी वेशभूषा. सर्व ज्ञाती संस्थेच्या संघाने दिलेल्या वेळेमध्ये उत्कृष्ट पणे भोंडला सादरीकरण केले. भोंडला कार्यक्रमाची बक्षिसे ही -
► उत्कृष्ट वेशभूषा कऱ्हाडे ब्राह्मण संघ
► उत्कृष्ट गाणी ब्राह्मण सभा
► उत्कृष्ट हत्ती सजावट चित्तपावन संघ
► उत्कृष्ट सादरीकरण देवरुखे संघ
► लक्षवेधी वेशभूषा बक्षीस -आरती म्युनिश्वर( अहिल्या च्या वेशभू्षेसाठी )
उपस्थित परीक्षकांनी उरलेल्या तीन संघांना सुद्धा भोंडला कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर केले.
भोंडला चा शेवट हा नेहमी खिरापत ओळखून होतो. तसाच एक खेळ कार्यक्रमात घेतला गेला.प्रत्येक संघाने आपली खिरापत आणली होती आणि तो संघ सोडून इतरांनी ती ओळखायची होती व त्यालाही बक्षीस होते.
भोंडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे महासंघाच्या कार्यकारिणी सदस्या आदिती जोशी यांनी केले.
परीक्षक म्हणून अनुराधा ताई मोहीदेकर,अनुराधा ताई फाटक आणि प्रतिभा ताई बिवलकर ह्या लाभल्या होत्या. तर वेळ नियंत्रक म्हणून शुभांगी ताई दूनाखे आणि पल्लवी आंबेकर यांनी उत्कृष्ट भूमिका निभावली. महिलांमधील सुप्त कला, गुणांना वाव हा हे भोंडला कार्यक्रमामुळे मिळाला. अतिशय सुंदर आणि हटके सादरीकरण तसेच वेग वेगळे विषय घेवून प्रत्येक संघाने भोंडल्याची गाणी ही खूपच छान पद्धतीने बसवली होती. आयोजक म्हणून ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे ॲड माधुरी जोशी आणि ब्राह्मण सभा, डोंबिवली तर्फे विद्या भिडे यांनी या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतली.
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, ब्राह्मण सभा, डोंबिवली चे संयुक्त कार्यवाह श्री. प्रदीप गोसावी, मृणाल सबनीस, श्रीपाद कुलकर्णी, देवरुखे संस्थेच्या अध्यक्षा मनीषा धोपटकर, तसेच सर्व संलग्न संस्थाचे पदाधिकारी हे कार्यक्रमाला उपस्थित होते.
भविष्यात वेग वेगळे कार्यक्रम हे आणखी मोठ्या प्रमाणात ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि सर्व संलग्न संस्था मिळून करणार असून त्यायोगे सर्व ज्ञाती समाज अधिक प्रमाणात एकत्रित होण्यास निश्चित मदत होणार आहे.
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित EXPO- 2023 ( दिनांक ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर, सकाळी १० ते रात्री ९ वाजे पर्यंत ) ह्या भव्य ग्राहक पेठेच्या ( प्रदर्शन आणि विक्री ) उदघाटन समारंभाचा सोहळा हा दिनांक ८ सप्टेंबर रोजी ब्राह्मण सभा, तळ मजला हॉल, डोंबिवली पूर्व इथे मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुनील कुराडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त ( वाहतूक विभाग ) श्री. मंदार धर्माधिकारी हे होते. पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते हे विशेष आमंत्रित होते. दोन्ही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि फीत कापून प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. ह्या वेळी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे, सह कार्यवाह आणि प्रकल्प प्रमुख सौ. मंजिरी देवधर, उपाध्यक्ष श्री. अनिकेत घमंडी आणि श्री. निलेश वीरकर, कोषाध्यक्ष श्री. जयंत कुलकर्णी, सह कोषाध्यक्ष श्री. उल्हास दाते, कऱ्हाडे सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण नाटेकर, चित्तपावन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. माधव घुले, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष श्री. मधुकर कुलकर्णी, कार्यवाह श्री. सुधीर बर्डे, देवरुखे संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनीषा धोपटकर, काण्व परिषद संस्थेचे कार्यवाह श्री. मधुकर कुलकर्णी, कल्याण जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. सचिन आंबेकर तसेच ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे सर्व सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाला ABP माझा च्या ज्ञानदा कदम तसेच भारतीय डिजिटल पार्टी ( You tube channel ) चे श्री. अमेय कदम ह्यांनी भेट दिली. ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित EXPO - 2023 ( भव्य ग्राहक पेठ - प्रदर्शन आणि विक्री ) च्या आज दुसऱ्या दिवशी दिनांक ९ सप्टेंबर रोजी नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. सर्व स्टॉल वर प्रचंड गर्दी होती.
प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सौ. सायली मुतालिक ( Managing Director - ParaForce HR Services Pvt. Ltd, महिला उद्योजक आघाडी प्रमुख भारतीय जनता पार्टी- महाराष्ट्र राज्य ) ह्यांनी प्रदर्शनाला विशेष भेट दिली आणि सर्वांचे कौतुक केले. सौ. सायली मुतालिक ह्यांच्या हस्ते ह्या वेळी सर्व स्टॉल धारकांचा सन्मान करण्यात आला.
तसेच देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्थेचे अध्यक्ष श्री. जगन्नाथ जोशी, विश्वस्त अध्यक्ष श्री. अविनाश कुलकर्णी ह्यांच्या हस्ते प्रायोजकांचा सन्मान करण्यात आला.
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित EXPO - 2023 ( भव्य ग्राहक पेठ - प्रदर्शन आणि विक्री ) च्या तिसऱ्या दिवशी दिनांक १० सप्टेंबर रोजी पण नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. सर्व स्टॉल वर सतत गर्दी होती. प्रदर्शन हे अतिशय भव्य प्रमाणात आणि नियोजित पणे संपन्न झाले. अडीच दिवसांत ४५०० पेक्षा जास्ती नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली आणि खरेदी केली.
प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी ब्राह्मण सभा, डोंबिवली चे अध्यक्ष डॉ. विनय भोळे, Gallop गिफ्ट चे श्री. प्रदीप जोशी, IAS श्री. विजय जोशी, मान्यवर श्री विश्वजित देशपांडे, श्री. सच्चीदानंद शेवडे अश्या अनेक नावाजलेल्या लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली.
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे आयोजित करण्यात आलेले प्रदर्शन EXPO - 2023 म्हणजे एक शानदार सोहळा होता.
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा, डोंबिवली ह्यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित केलेल्या समाज जागृती आणि समाज प्रबोधनपर गर्भाधान संस्कार ते उपनयन संस्कार या व्याख्यानामध्ये गर्भाधान, पुसंवन सीमांतोन्नयन, जातकर्म,नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, कर्णभेद, विद्यारंभ, उपनयन, वेदारंभ समावर्तन, विवाह, अंत्येष्टी अश्या विविध मुद्दयांवर प्रमुख वक्ते श्री. मुकुंद जोशी गुरुजी ह्यांनी उपस्थित श्रोत्यांना सखोल माहिती दिली. मुकुंद जोशी गुरुजी ह्यांनी व्याख्यानाची सुरवात ही संस्कार म्हणजे काय ह्या मुद्द्यावर भर देऊन केली
संस्कार म्हणजे चांगलं निर्माण करणे.. संस्कारांमुळे व्यक्तीचं मन आणि मस्तिष्क पवित्र होते . सुशिक्षित व्यक्ती ही स्वतः ची व स्वतःच्या कुटुंबाची प्रगती करू शकतो, पण सुसंस्कारित व्यक्ती ही स्वतः सोबत समाजाची प्रगती करू शकतो. आपल्या पूर्वजांनी समाज सुसंस्कारित व्हावा म्हणून काही मार्गदर्शन केले आहे, ते म्हणजे सोळा संस्कार...
१) गर्भाधान संस्कार - अनेक ठिकाणी ऋतुशांती किंवा रजोदर्शन शांती असे म्हणतात. ज्या वेळी कुमरिकेला स्रित्व प्राप्त होतं त्या वेळेस काही दोष असतील तर ते निवारणासाठी हा संस्कार केला जातो
२) पुसंवन - गर्भधारणा झाल्यावर गर्भ व मातेची पकृत्ती स्थिर राहण्यासाठी हा संस्कार करतात.
३) सिमंतोनयन - गर्भवती स्त्री व गर्भ प्रसन्न राहण्यासाठी , स्रीचे डोहाळे पुरवण्यासाठी तसेच गर्भाच्या सर्वांगी विकासासाठी हा म्हणजेच डोहाळे जेवण संस्कार करतात.
४) जातकर्म - ह्या संस्कारात बाळ जन्माला आल्यावर नाळ छेदनापूर्वी बाळाला वडिलांनी सोन्याच्या तारेने मध चाटवले जाते.
५) नामकरण - ह्या जीवर्म्याने मागील जन्माची ओळख पुसली असते, ह्या जन्मात त्याला त्याची नवीन ओळख मिळवून देण्यासाठी हा संस्कार आहे.
६) निष्क्रमण - बाळाच्या बल, बुद्धी, आयुष्याच्या विकासासाठी सूर्य देवाचे दर्शन व्हावे म्हणून मंदिरात नेतात.
७) अन्नप्रशान - बाळाच्या शारीरिक, मानसिक, व भावनिक विकासासाठी षडरस अन्नाची चव दिली जाते.
८) कर्णभेद - जीवनात स्थिरता प्राप्त होण्यासाठी व राहू ग्रह शांत राहण्या साठी मुलगा असो वा मुलगी कान टोचतात.
९) चौल/ चुडा कर्म - पूर्व जन्माचे पातक नाश होण्यासाठी हा संस्कार म्हणजे जाऊळ हा संस्कार करतात.
१०) विद्यारंभ - बालकाला अक्षर ओळख होण्यासठी हा संस्कार सांगितलं आहे.
११) उपनयन संस्कार - हा कुमारांसाठीचा मुख्य संस्कार आहे. ब्रम्हचर्य व्रताचे पालन करून उत्तम ज्ञानार्जन करण्यासाठी हा संस्कार आहे. गायत्री मंत्राचा उपदेश घेऊन यज्ञपवित ( जानवे ) घालतात. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो तसेच वैदिक धर्मात सांगितलेली कर्मे करण्याचा अधिकार प्राप्त होतो.
व्याख्यानाला ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा अध्यक्ष श्री. प्रदीप जोशी गुरुजी, विश्वस्त अध्यक्ष श्री. मधुकर कुलकर्णी, कार्यवाह श्री. सुधीर बर्डे, कऱ्हाडे सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण नाटेकर तसेच डोंबिवली मधील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन हे श्री. शंतनू पुराणिक ह्यांनी केले. आभार प्रदर्शन हे सौ. माधुरी जोशी ह्यांनी केले.
► दिनांक ३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५.३० ते ७.३० ह्या वेळेत ज्ञानेश्वर कार्यालय, डोंबिवली पश्चिम इथे ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित होणाऱ्या "गर्भाधान संस्कार त
दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि सर्व संलग्न ब्राह्मण संस्था ( देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ, चित्तपावन ब्राह्मण संघ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभा, देवरुखे ब्राह्मण संघ, काण्व परिषद आणि ब्राह्मण सभा, डोंबिवली ) तसेच पुरोहित मंडळ ( डोंबिवली पूर्व ) आणि देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळ, डोंबिवली ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण समाज एकत्रिकरण या दृष्टीने डोंबिवली मध्ये पहिले पाऊल म्हणून प्रथमच सामुहिक श्रावणी कार्यक्रमाचे भव्य आयोजन हे कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळाचे समाज मंदिर हॉल, टिळकनगर, डोंबिवली पूर्व इथे सकाळी ७ वाजल्या पासून करण्यात आले होते. एकूण २२५ पेक्षा जास्ती सदस्यांनी श्रावणी कार्यक्रमात भाग घेतला आहे. ऋग्वेदी, कृष्ण यजुर्वेदी आणि शुक्ल यजुर्वेदी पद्धतीने श्रावणी अत्यंत विधिवत प्रकारे करण्यात आली. ब्राह्मण समाज एकत्रिकरण दृष्टीने महत्वाचे पाऊल हे ब्राह्मण महासंघा तर्फे डोंबिवली मध्ये रोवण्यात आले.
► https://youtu.be/7eIMg-PF-O0?si=JP89aUekVwp9mxQb
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदीन ब्राह्मण सभा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ जून २०२३ रोजी" नित्य नैमित्तीक धार्मिक कार्य आणि आपण " ह्या विषयावर पहिल्या चरणाच्या समाज प्रबोधन कार्यक्रमाची यशस्वी पणे सांगता ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, डोंबिवली पश्चिम इथे झाली. प्रमुख वक्ते श्री. सचिन ठाकुरदेसाई ( अध्यक्ष - पुरोहित मंडळ, डोंबिवली पूर्व ) ह्यांनी अतिशय सहज सुंदर भाषेत विविध नित्य धार्मिक कार्याची माहिती आणि आवश्यकता सर्व श्रोत्यांना समजावून सांगितली. डोंबिवली मधील बऱ्याच जेष्ठ आणि मान्यवर नागरिक ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. विविध प्रकारचे समाज प्रबोधन आणि जागृती कार्यक्रम दर दोन महिन्यांनी दोन्हीही संस्था संयुक्त विद्यमाने करणार आहेत. कार्यक्रमाला ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, शुक्ल यजुर्वेदी संस्थेचे विश्वस्त अध्यक
दिनांक ६ मे २०२३ रोजी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे ज्ञानमंदिर विद्यासंकुलाच्या कोतकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवली इथे विद्यार्थ्यांना टेबल टेनिस टेबल आणि इतर साहित्य भेट देण्यात आले. सदर भेट ही महासंघाचे हितचिंतक श्री. अभिजित वैद्य ह्यांच्या माध्यमातून वैद्य कुटुंबीय ह्यांच्या तर्फे भालचंद्र वैद्य ह्यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात आली. ह्या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता पाखले, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे, सह कोषाध्यक्ष श्री. उल्हास दाते, कार्यकारिणी सदस्य सौ. माधुरी जोशी तसेच विद्यालयाचे शिक्षक आणि इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. शाळेतर्फे ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे आभार मानले.
► http://www.nyayranbhumi.com/2023/05/blog-post_71.html
► https://marathi.mumbaiaaspaas.com/table-tennis-table-other-materials-provided-to-kotkar-school-by-brahmin-federation/
दिनांक १५ एप्रिल २०२३ रोजी, ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित मानसिक आरोग्य आणि समस्या ह्या माहिती सत्र कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. प्रमुख वक्त्या सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ व समुपदेशक सौ. वृषाली आठल्ये ह्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थित नागरिक बंधू भगिनी ह्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले तसेच विचारलेल्या सर्व प्रश्नांना / समस्यांना सविस्तर उत्तरे दिली. कार्यक्रम प्रमुख म्हणून ब्राह्मण महासंघ, डोंबिवली कार्यकारणी सदस्य सौ. माधुरी जोशी ह्यांनी उत्तम प्रकारे नियोजन केले. महासंघाचे कार्यकारिणी सदस्य श्री. योगेश वीरकर, श्री. अभिजित कानिटकर, सौ. उचिता निमकर, सौ.आदिती जोशी, इतर सदस्य सौ. विदुला वामोरकर, सौ.रुपाली उपाध्ये , सौ. अश्विनी मुजुमदार ह्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाची साथ दिली. ह्यावेळी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे, उपाध्यक्ष श्री. अनिकेत घमंडी, महासंघाचे माजी अध्यक्ष श्री. प्रज्ञेश प्रभुघाटे तसेच चित्तपावन संस्थेचे कार्याध्यक्ष आणि महासंघाचे सल्लागार सदस्य श्री. माधव घुले, देवरुखे संस्थेच्या अध्यक्षा आणि महासंघाच्या सल्लागार सदस्य सौ. मनीषा धोपटकर तसेच महासंघाच्या इतर संलग्न संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ह्या कार्यक्रमासाठी श्री. माधव घुले ह्यांनी सर्व बहुमोल्य मदत केली ह्या बद्दल त्यांचे मनापासून आभार ! कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माधुरी जोशी ह्यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. वैशाली कोरडे ह्यांनी दिला. आभार प्रदर्शन हे कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे ह्यांनी केले.
दिनांक १९ मार्च २०२३ रोजी ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि ब्राह्मण सभा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत विविध व्यवसाय संधी आणि सरकारी योजना ह्या विषयाबाबत माहिती सत्राचे आयोजन हे ब्राह्मण सभा, पहिला मजला इथे करण्यात आले होते. प्रमुख वक्ते म्हणून श्री. प्रदीप पेशकार ह्यांनी उपस्थितांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले तसेच विविध सरकारी योजना आणि व्यवसाय संधी या बाबत सविस्तर माहिती दिली. ह्यावेळी जवळ जवळ २०० पेक्षा अधिक सर्व श्रेणी व्यावसायिक / उद्योजक / नागरिक ह्यांनी माहिती सत्राचा लाभ घेतला. ह्यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. विनय भोळे, ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे, ब्राह्मण महासंघ कार्यवाह सौ. अनघा बोन्द्रे तसेच ब्राह्मण सभा आणि ब्राह्मण महासंघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. महासंघाचे सदस्य श्री. योगेश वीरकर ह्यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण महासंघाचे कोषाध्यक्ष श्री. जयंत कुलकर्णी आणि कार्यकारिणी सदस्य श्री. विवेक वामोरकर ह्यांनी उत्तम प्रकारे आयोजन आणि नियोजन केले.
ब्राह्मण महासंघ डोंबिवली आयोजित भव्य भोंडला दिनांक १ ऑक्टोंबर २०२२ रोजी शुभम हॉल, डोंबिवली पूर्व इथे अतिशय उत्साहात पार पडला. प्रचंड गर्दी आणि उत्साही वातावरण अनुभवला मिळाले.सगळ्या वयाच्या महिला एकत्रित येवून एकच वेळी एखाच ठिकाणी फेर धरत होत्या.भारतीय संस्कृती, परंपरा कुठेतरी लोप पावत आहे आणि नवीन पिढीला हे भोंडला खेळ माहीत होणे अतिशय गरजेचे आहे हे दाखवण्याचा हा महासंघ चा प्रयत्न होता. कलर्स मराठी वहिनी वरील सूर नवा ध्यास नवा ची कलाकार सई जोशी हिची प्रमुख उपस्थिती होती. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. मानस पिंगळे ह्यांनी भोंडला कार्यक्रमाचे उदघाटन केले आणि उपस्थित महिलांना भोंडला आणि हत्ती ह्याचे महत्व सांगितले. उत्कृष्ट सादरीकरण साठी घे भरारी ग्रुप ने बक्षीस पटकावले. उत्कृष्ट लक्षवेधी वेशभूषा साठी शु.य.मा.ब्राह्मण सभेचे मुक्ताई महिला मंडळाला बक्षिस मिळविले. उत्कृष्ट गीत जे स्वयं रचित आणि सामाजिक जाणीव करून देणारे होते या साठी जिजाऊ ग्रुप ने बक्षीस मिळवले. आपल्या गीतातून सादरीकरणातून नव्या जुन्याची सांगड घालत लक्षवेधी सादरीकरण यासाठी देवरूखे ब्राह्मण संघाने बक्षिसावर आपला हक्क मिळवला.कालच्या भोंडल्यात काही विशेष आणि लक्षवेधी क्षण अनुभवायला मिळाले. ९२ वर्षाच्या आजींनी इथे फेर धरला. तसेच ८२ वर्षाच्या आजी लहान मुलीच्या भूमिकेत परकल पोलके घालून दोन वेण्या घालून आल्या आणि त्यांनीही फेर धरला. संधीवातामुळे दोन्ही गुढगे वाकलेले असतानाही एका ८० वर्षांच्या महिलेने ग्रुप मध्ये फेर धरला आणि ग्रुपला बक्षीसही मिळवून दिले.लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. जवळ जवळ २७५ पेक्षा जास्ती महिलांनी सहभाग घेतला होता. महासंघाच्या कार्यकारणी च्या कार्यवाह अनघा बोन्द्रे, कोषाध्यक्ष जयंत कुलकर्णी,सह कोषाध्यक्ष उल्हास दाते, उपाध्यक्ष अनिकेत घमंडी आणि इतर सदस्य विनायक जांभेकर, शंतनू पुराणिक, विवेक वामोरकर, योगेश वीरकर, मृणाल सबनीस,अभिजित कानिटकर ह्यांनी भोंडला यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. महासंघाचे उपाध्यक्ष अनिकेत घमंडी ह्यांनी ह्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले. महिला समिती प्रमुख माधुरी जोशी ह्यांच्या नेतृत्वाखाली वैशाली कोरडे,क्षमा धामणकर आणि महिला समितीने अतिशय उत्तम प्रकारे कार्यक्रमाची जबाबदारी यशस्वी पणे पार पाडली. तसेच भोंडल्याची गायन टीम ज्यात सुरेखा जोशी,माधुरी एल्लाबादकर , दिवेकर काकु,जयश्री कुलकर्णी काकु,ताम्हणे काकु आणि अर्चना खेर ह्यांचा सहभाग ही अतिशय महत्वाचा होता आणि सगळ्यांनी आपली भूमिका चोख बजावली आणि कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. सगळ्यांचे मनापासुन अभिनंदन!!!