आमच्या विषयी...

डोंबिवली, मुंबईच्या जवळच असलेलं ठाणे जिल्हातील एक प्रमुख शहर. डोंबिवली शहराला ६०० वर्षांचा इतिहास आहे आणि असं म्हटलं जातं की येथील मूळ निवासी डोंब लोकांवरून ह्या शहराला हे नाव पडले. मुंबई सारख्या मुख्य शहरापासून या शहराला जवळचा रास्ता नाही आणि म्हणून सर्व भिस्त रेल्वेवर असतानाही या शहराचा विकास सर्व जातीच्या समाजबांधवांकडून होत राहिला. त्यात ब्राह्मण समाजाचेही भरपूर योगदान आहे. मुंबईतील वाढत्या शहरीकरणामुळे अनेक ब्राह्मण कुटुंबे दादर, गिरगाव मधून डोंबिवलीत स्थलांतरित झाली. जसं जशी लोकवस्ती वाढत तसं तसे ब्राह्मण पोटजातीत वेग वेगळे संघ स्थापन होऊ लागले.

अधिक वाचा

संलग्न संस्था